तरूणांना घरातून खेचून चांबळेत बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:06 PM2018-12-10T23:06:13+5:302018-12-10T23:06:50+5:30

अकरा आरोपींवर गुन्हा दाखल

Striking a young woman with a stiff neck | तरूणांना घरातून खेचून चांबळेत बेदम मारहाण

तरूणांना घरातून खेचून चांबळेत बेदम मारहाण

googlenewsNext

वाडा : या तालुक्यातील चांबळे गावातील तरूणांना घरातून फरफटत बाहेर नेऊन कामाच्या ठेक्याच्या वादावरून बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अकरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र पाटील, चेतन पाटील अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांच्या हाता पायाला व डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील चांबळे या गावात नरेंद्र पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी आपली जमिन एका उद्योजकाला विकली असून त्या जमिनीवर कारखाना टाकताना जे बांधकाम होईल. त्याचा ठेका नरेंद्रला देण्याचे उद्योजकाने मान्य करून तसा करार केला होता. कारखान्याच्या जागेचे सपाटीकरण (लेव्हलिंग) सुरू असतांना गावातील विरोधक आरोपी हे जागेवर जाऊन काम बंद कर येथे तुम्ही काम करायचे नाही असे सांगितले. नाहीतर परिणामांना सामोरे जा असा सज्जड दम भरला. त्यानंतर दोघांत बाचाबाची होऊन नरेंद्र याला दंडुक्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर नरेंद्र पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना लोहोपे बसथांब्याजवळ पुन्हा मारहाण केली. त्यानंतर घाबरून फिर्यादी येथील एका घरात लपण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याला त्या घरातून फरफटत बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी व दंडुक्याने मारहाण केली. नरेंद्र चा भाऊ चेतन व नरेंद्र ची पत्नी सोडवायला आले असता त्यांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघां भावांच्या हाता पायाला व डोक्यावर गंभीर दुखापती झाल्याने त्यांच्यावर ठाणे येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या झटापटीत फिर्यादी यांच्या पत्नीचे मंगळसूत्र तसेच गंठण कोठेतरी पडून गहाळ झाले.

Web Title: Striking a young woman with a stiff neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.