एसएस फार्मा : कामगाराच्या मृत्यूचा तपास सुरू;पोलीस, औद्योगिक सुरक्षा विभागाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:23 AM2017-10-13T01:23:32+5:302017-10-13T01:23:49+5:30

तारापूर एमआयडीसी तील एस एस फार्मातील कामगाराच्या मृत्यूचा तपास बोईसर पोलीस व औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सुरू असून कुणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठारे कारवाई होईल असे संकेत अधिकाºयांनी दिले आहेत

SS Pharma: Investigation of the death of the worker starts, inquiry by the police, industrial security department | एसएस फार्मा : कामगाराच्या मृत्यूचा तपास सुरू;पोलीस, औद्योगिक सुरक्षा विभागाकडून चौकशी

एसएस फार्मा : कामगाराच्या मृत्यूचा तपास सुरू;पोलीस, औद्योगिक सुरक्षा विभागाकडून चौकशी

googlenewsNext

पंकज राऊत 
बोईसर : तारापूर एमआयडीसी तील एस एस फार्मातील कामगाराच्या मृत्यूचा तपास बोईसर पोलीस व औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सुरू असून कुणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठारे कारवाई होईल असे संकेत अधिका-यांनी दिले आहेत
दि. ७ आॅक्टोबरला सायंकाळी रोहिदास बारी या कामगाराची तब्बेत बिघडल्याने त्याला प्रथम बोईसरच्या डॉ. पराग कुळकर्णी यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्यांनी त्याला दाखल करून न घेता दुसºया रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला तेथून एमआयडीसी मधील तुंगा रु ग्णालयात नेले परंतु त्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता असे तुंगाच्या व्यवस्थापनाने पोलिसांना सांगितले.
मात्र दाखल केलेले गंभीर आजाराचे रूग्ण व मृत्यू पावलेल्या रुग्णाची माहिती त्वरीत पोलीस स्थानकात देणे बंधनकारक असूनही त्याची माहिती तुंगा रूग्णालया बरोबरच एस एस फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनानेही दिली नाही. बारी याचा मृत्यू हा वायूच्या बाधेमुळे झाल्याचा संशय व्यक्त करून हे प्रकरण दाबण्या करीताच कंपनीने संबंधित शासकीय यंत्रणेला कळविले नसल्याचा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर तारापूर औद्योगिक क्षेत्रात फिरु लागल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले होते
कारखाना व्यवस्थापनाने हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे जबाबात सांगितले असले तरी या मृत्यूची माहिती बोईसर पोलिसाबरोबरच औद्योगिक सुरक्षा विभाग आणि आरोग्य संचालनालयाला त्वरित कळविली नव्हती तर औ. सु. विभागाला ती ९ आॅक्टोबरला संध्याकाळी कळविली होतीे. पोलिसानीही तपास व जाबजबाब घेण्याचे काम सुरू केले असून आता पर्यंत रु ग्णालयाचे डॉक्टर आण िकंपनी मधील कामगार व व्यवस्थापनाचे प्राथमिक जबाब घेण्यांत आले असून मृत कामगाराच्या जवळच्या नातेवाईकांचे ही जबाब घेण्यात येणार आहेत.

Web Title: SS Pharma: Investigation of the death of the worker starts, inquiry by the police, industrial security department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.