सोपारा बौद्ध स्तुपाची दुरवस्था, सरकारचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:30 AM2018-11-18T00:30:56+5:302018-11-18T00:31:09+5:30

नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा येथील बौद्य स्थूप सद्या दुर्लक्षीत अवस्थेत आहे. फार वर्षापुर्वी चंदनी दरवाजे असलेल्या या बुदधविहारची स्थापना भगवान गौतम बुद्धांनी केली होती अशी इतिहात नोंद आहे.

 Sopara Buddhist Stupa's , government's ignorance | सोपारा बौद्ध स्तुपाची दुरवस्था, सरकारचे दुर्लक्ष

सोपारा बौद्ध स्तुपाची दुरवस्था, सरकारचे दुर्लक्ष

googlenewsNext

वसई : नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा येथील बौद्य स्थूप सद्या दुर्लक्षीत अवस्थेत आहे. फार वर्षापुर्वी चंदनी दरवाजे असलेल्या या बुदधविहारची स्थापना भगवान गौतम बुद्धांनी केली होती अशी इतिहात नोंद आहे. मात्र, आता स्तुपाच्या प्रवेशद्वाराची पडझड झाली असून अनेक सोयीसूविधांची वानवा या परिसरात आहे. त्यामूळे येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
हा स्तुप मर्देस आणि नालासोपारा यांच्या सिमेवरील सोपारा गावाजवळ आहे. स्थानिक लोक याला पूर्वी बुरूड राजाचा किल्ला म्हणत असत. इथेच अनेकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. भगवान बुद्धांनी ५०० महिलांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली असल्याचा उल्लेखही तत्कालिन ग्रंथामध्ये आढळतो. हा स्तुप सांची स्तुपासारखा होता. काळाच्या ओघात तो नष्ट झाला. येथे अधुनमधुन जगभरातून पर्यटक येत असतात. स्तुपात येणाºया भाविकांसाठी प्रसाधनगृहाचीही सोय नसून बसण्याचीही व्यवस्था नाही. स्तुपाची दररोज स्वच्छताही होत नसल्याने येथे येणाºया पर्यटकांची गैरसोय होत आहे.
गौतम बुद्ध यांच्या वास्तव्यामुळे हा स्तूप जगभरातील बौद्ध संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा स्तूप पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे कायद्याने महानगरपालिकेला येथे हस्तक्षेप करता येत नाही. मात्र, पुरातत्व खात्याचेही येथे दुर्लक्ष आहे. महानगरपालिकेने मार्च महिन्यात येथे येणाºया अनुयायांसाठी अडीच लाख रु पये खर्चून जलशुद्धीकरण यंत्रणा बसवली होती. मात्र, स्तुपाजवळ कुठलीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने त्या यंत्राचीही चोरी झालेली आहे. पुरातत्त्व खात्याने फिरते शौचालय देण्याचे आश्वासन हवेत विरले आहे.
येथे एखादा कार्यक्र म असेल तरच महानगरपालिकेकडून फिरते शौचालयाची व्यवस्था करण्यात येते. मात्र, अन्य वेळी येथे येणाºया अनुयायांची गैरसोय होत असते.स्तुपाच्या मार्गावर महापालिकेने भव्य प्रवेशद्वार बनवले होते. या प्रवेशद्वारावरील मूर्तीही निखळून पडू लागल्या आहेत.

पर्यटनविकास रखडला
बौद्ध स्तुपाच्या ६५ एकर परिसराचा विकास करण्यात येणार होता. राज्य शासन, पर्यटन विभाग आणि बुद्धिस्ट हेरिटेज अ?ॅण्ड कल्चर सेंटरतर्फे हा विकास केला जाणार होता. त्यात स्मारक, अभ्यास केंद्र, विश्रांतिगृह, हॉटेल, उद्याने आदींचा समावेश होता.
याशिवाय बौद्ध संस्कृतीचे वास्तुसंग्रहालय तयार केले जाणार होते. या प्रकल्पासाठी ४०० कोटी रु पयांचा खर्च अपेक्षति होता. मात्र हा प्रकल्पदेखील रखडला आहे. बौद्ध स्तुपाच्या परिसराला अतिक्र मणाने वेढा घातला आहे. ३४ एकर शासकीय जमिनीवर अतिक्र मण झालेले आहे.

या बौद्ध स्तुपाला हजारो पर्यटक, बौद्ध भिक्खू, अनुयायी भेट देत असतात. मात्र, तिथे प्राथमिक सोयीसुविधाही नसल्याने त्यांची गैरसोय होत असते, स्तुपाच्या परिसरात बसण्यासाठी बाकेही नाहीत. त्यामुळे इथे येणारे बौद्ध भिक्खूआपल्यासोबत तंबू घेऊन येतात, असे ते म्हणाले.
- नरेश जाधव, सचिव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी
जयंती समिती

Web Title:  Sopara Buddhist Stupa's , government's ignorance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.