शॉर्ट फिल्म ‘She’ला मिळाले दादासाहेब फाळके ज्युरी अ‍ॅवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 01:39 AM2019-05-07T01:39:21+5:302019-05-07T01:39:41+5:30

सन २०१२ मध्ये आॅस्कर विजेत्या लाईफ आॅफ पाई (स्रं्र)या हॉलिवूडपटा मधून छोट्या पाईच्या बाल भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर चर्चेत आलेल्या वसईच्या आयुष टंडनने बाजीराव मस्तानी मधूनही नानासाहेब पेशवा साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.

 Short film 'She' got Dadasaheb Phalke Jury Award | शॉर्ट फिल्म ‘She’ला मिळाले दादासाहेब फाळके ज्युरी अ‍ॅवॉर्ड

शॉर्ट फिल्म ‘She’ला मिळाले दादासाहेब फाळके ज्युरी अ‍ॅवॉर्ड

Next

- सुनील घरत
पारोळ : सन २०१२ मध्ये आॅस्कर विजेत्या लाईफ आॅफ पाई या हॉलिवूडपटा मधून छोट्या पाईच्या बाल भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर चर्चेत आलेल्या वसईच्या आयुष टंडनने बाजीराव मस्तानी मधूनही नानासाहेब पेशवा साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. आता आयुषने त्याहून मोठी उडी घेतली आहे. मुली आणि स्त्रियांच्या लैंगिक छळवणुकीचा विषय घेऊन, पुरु षी कामुकतेच्या विकृत मानसिकतेवर प्रहार करणाº्या ‘रँी’ या शॉर्ट फिल्म मधून आयुषने मध्यवर्ती भूमिका साकारली असून, या शॉर्ट फिल्मने खूप मोठा सामाजिक संदेश देत, दिल्लीच्या दादासाहेब फाळके स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड ला गवसणी घातली आहे.

शुक्र वारी दिल्लीत झालेल्या यंदाच्या दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड सोहळ्यावर फरहान अख्तर निर्मित आणि रंजीता कौर दिग्दिर्शत ‘शी’ या तीन मिनिटांच्या हिंदी शॉर्ट फिल्मचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला. अगदीच अल्पसंवाद, उत्कट अभिनय, समर्पक संगीत आणि छोटया छोट्या प्रसंगातून फुलत गेलेल्या सुप्त कथानकातून स्त्री-जन्माचा भोग आणि समाजातील बिभत्स पौरूषत्वाचा खराखुरा चेहरा ‘रँी ‘शी’ (अर्थात ती)मधून दर्शकांसमोर ठेवला आहे. या फिल्म मध्ये मध्यवर्ती भूमिकेत आपले अभिनय कौशल्य दाखिवणार्या वसईच्या आयुष टंडनने आणखी एक भरारी घेऊन वसईची कला क्षेत्रातील पताका पुन्हा एकदा उंचीवर नेऊन ठेवली आहे.

फरहान अख्तर यांच्या मर्द आॅफिशियल या स्वत:च्या यु-ट्युब चॅनेलवर नोहेंबर २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘रँी शी या शॉर्ट फिल्म ला आतापर्यंत २.८ मिलियन व्ह्यूज आणि पाच हजार कॉमेंट आले आहेत. यात एक तरु ण युवतीचे रूप घेऊन, बाहेर पडतो. एक मुलगी म्हणून वावरतांना त्याला ज्या विकृत पुरु षी कामुकतेच्या नजरा आणि स्पर्शाचा सामना करावा लागतो. त्याचे वास्तववादी दर्शन यात चित्रित झाले आहे. आलेला अनुभव घेऊन शेवटी हा तरु ण, अर्थात आयुष आपला स्त्री-वेश, मेकअप उतरवून, मैत्रिणीला म्हणतो, मै एक घंटा नही सह पाया ये घिनौनापन, हर वक्त, हर जगह, आप कैसे सह पाती हो? आणि फिल्म संपते. आयुष व्यतिरिक्त या फिल्म मध्ये नेहा शर्मा, कनिष्का अग्रवाल, गयासुद्दीन शेख, भूपेश बेंडकर, निखिल, अश्विनी कुमार, वैभव दीक्षित यांनीही भूमिका केल्या असून, इकबाल राज यांनी कथा लिहिली आहे.

आयुषला करायचा आहे अ‍ॅक्टींगमध्येच करिअर

या निमित्ताने दै लोकमत संवाद साधतांना आयुष म्हणाला, ‘शी’ ‘रँी’ मधून खूप चांगला जनजागृतीपर संदेश दिला गेला असून, त्याचा अधिक प्रचार व प्रसार व्हायला हवा. यातील यश हे आम्हा सर्व टीमचे असून, या पुरस्कारातून प्रेरित होऊन पुढे आणखी अधिक चांगला अभिनय करेन.
माझे पिता हतींदर टंडन यांनी हिंदी रंगभूमीवर चांगला अभिनय केलेले असून, मी त्यांच्या कडूनच प्रेरणा आणि अभिनयाचे धडे घेतले. दर्शकांना माझे काम पसंत असल्याने आणखी कामे येत असून, आता मी अभिनयातच करियर करायचे ठरवले
आहे.

Web Title:  Short film 'She' got Dadasaheb Phalke Jury Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.