धक्कादायक वास्तव :निर्बीजीकरण केंद्रात रेबीजग्रस्त श्वान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 04:06 AM2018-11-19T04:06:52+5:302018-11-19T04:07:00+5:30

वसई-विरार शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्राद्वारे आॅक्टोबर २०१८ पर्यंत अंदाजे २४,२५० हजारांच्या आसपास श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे

 Shocking reality: The rabid-struck dog in the decompression center | धक्कादायक वास्तव :निर्बीजीकरण केंद्रात रेबीजग्रस्त श्वान

धक्कादायक वास्तव :निर्बीजीकरण केंद्रात रेबीजग्रस्त श्वान

Next

वसई : वसई-विरार शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्राद्वारे आॅक्टोबर २०१८ पर्यंत अंदाजे २४,२५० हजारांच्या आसपास श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव सुरुच आहे. गत आठवड्यात या निर्बीजीकरण केंद्रात पाच श्वानांचा भुकेमूळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, निर्बीजीकरणासाठी आणण्यात आलेल्या श्वानांसोबत रॅबीजग्रस्त श्वानही येथेच कोंबल्याची धक्कादायक माहिती प्राणिमित्रांकडून सांगण्यात आली. याबाबत सदर केंद्रचालकाविरोधात तक्र ार करुनही पोलिस कारवाई होताना दिसत नाही.
महापालिकेच्या अधिकृत नोंदीनुसार शहरात सध्या ३५ हजारांहून अधिक भटकी श्वान आहेत. पंरतू हा आकडा ७०,००० असल्याचे सांगण्यात येते. महापालिकेकडे नवघर पूर्व येथे एकमेव श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. त्यात दररोज १५ ते २० श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. परंतु हे केंद्रही आता अपुरे पडत आहे. या केंद्रात गेल्या आठवड्यात पाच श्वानांचा भुकेमूळे मृत्यू झाल्याचा आरोप प्राणिमित्र संघटनेकडून करण्यात आल्यामुळे हे निर्बीजीकरण केंद्र प्रकाशात आले होते.
या मृत पाच श्वानांपैकी दोन श्वानांचे मृतदेह परळ केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवून आठवडा उलटला तरी अजून अहवाल आला नाही. याबाबत अधिक माहिती घेतली असता शवविच्छेदनासाठी पैसे कोण खर्च करणार हा प्रश्न समोर आला आहे. केंद्रचालक म्हणतात की, हा खर्च आंम्ही करणार नाहीत, प्राणिमित्र संघटनेवाले सांगतात की, हा खर्च महानगरपालिकेने करायला हवा. तर पोलिस प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहेत.
हा वाद सुरू असतांना आता प्राणिमित्र संघटनांनी नवीन विषयाला वाचा फोडत या निर्बीजीकरण केंद्राची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी प्राणिमित्र संघटनेचे कार्यकर्ते निर्बीजीकरण केंद्रात गेले असता केंद्रचालकाने विजीटर्सची वेळ संपल्याची सांगत त्यांना प्रवेश नाकारला होता. मात्र प्राणिमित्र संघटनांनी रजिस्टर नोंदवही तपासली असता, वहितील काही पाने फाडली गेल्याचे निदर्शनास आले होते. याच वेळी निर्बीजीकरण केंद्रात आणलेल्या श्वानांसोबत असलेल्या एका लहान वयाच्या श्वानाबद्दल माहिती घेतली असता तो श्वान २५ ते ३० लोकांना चावल्यामूळे तो रेबीजग्रस्त असावा अशी शंका डॉक्टरांना वाटत असतानाच तो अचानक मृत्यूमुखी पडला. त्यामूळे तो श्वान रेबीजग्रस्त होता, तसेच त्याला निर्बीजीकरणासाठी आणलेल्या इतर श्वानांसोबत कसे ठेवू शकता असा प्रश्न त्यांनी केंद्रचालक दगडू लोंढे यांना विचारला. मात्र, याबाबत त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे प्राणीमीत्रांनी माणिकपूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्र ार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र, अजूनही पोलिसांनी तक्र ार दाखल केलेली नाही. मृत रेबीजग्रस्त श्वान उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

कागदपत्रे सादर करा महापालिका खर्च देईल!
आता प्राणीमीत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपण हा शवविच्छेदनाचा खर्च केल्याचे सांगितले आहे. याबाबत प्रभारी सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी प्राणीमीत्रांनी याबाबत कागदपत्रे सादर करावी, पालिका खर्च देईल असे सांगितले आहे.
या निर्बीजीकरण केंद्रात तीन ते चार महिन्यांच्या छोट्या श्वानांच्या पिल्लांवरही नसबंदी शस्त्रक्रीया करण्यात येत असल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केला असून नवघर पूर्व येथे असणाऱ्या या निर्बीजिकरण केंद्राच्या चौकशीची मागणी केली आहे.

रोगी व जखमी श्वानांसाठी निर्बीजीकरण केंद्रात वेगळा वॉर्ड बनविण्यात यावा अशी केंद्र चालकाची मागणी आहे. प्राण्यांची शिरगणती सुरू आहे. अहवाल आल्यानंतर शहरात किती श्वान आहेत याचा अंदाज येईल. प्रास्तावित इतर दोन निर्बीजीकरण केंद्र सुरू झाल्यावर शहरातील श्वानांच्या वाढत्या संख्येवर आळा बसेल.
- सुखदेव दरवेशी,
प्रभारी सहाय्यक आयुक्त

या निर्बीजीकरण केंद्रातील सर्वच व्यवहार संशयास्पद आहे. रेबीजग्रस्त श्वान व नसबंदी करण्यासाठी आणलेले श्वान एकाच वॉर्डमध्ये ठेवले जातात. वयाने लहान श्वानांवरही नसबंदी शस्त्रक्रीया केली जात असल्याचा संशय आहे. पोलिसही सहकार्य करीत नाहीत.
- मितेश जैन, अ‍ॅनीमल वेल्फेअर
बोर्ड आॅफ इंडिया, सदस्य

Web Title:  Shocking reality: The rabid-struck dog in the decompression center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.