School bus accident, 16 children injured in palghar | पालघरजवळ स्कूलबसला अपघात, 16 मुले जखमी
पालघरजवळ स्कूलबसला अपघात, 16 मुले जखमी

पालघर - माहीम रस्त्यावर पानेरी पुलानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेपी इंटरनॅशनल स्कूलच्या बसला झालेल्या अपघातात 16 मुले जखमी झाली आहेत. त्यातील 2 मुलांना जास्त मार बसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पालघरच्या ढवळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्कूलवाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला गेली. गाडीचा वेग जोराचा असल्यामुळं एका झाडाला धडकल्यानंतर व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. तर, गाडीतील 16 विद्यार्थ्यांना जखम झाली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांची काळजी घेतली. तसेच गंभीर जखमी असलेल्या दोन मुलांना पालघरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 


Web Title: School bus accident, 16 children injured in palghar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.