मोखाड्यात टंचाईच्या झळा; हंडाभर पाण्यासाठी मायलेकींची मैलोन्मैल पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:10 PM2019-03-14T23:10:50+5:302019-03-14T23:11:52+5:30

तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही.

Scarcity of milk in the market: Mylakei's Melonmel Footpath for crispy water | मोखाड्यात टंचाईच्या झळा; हंडाभर पाण्यासाठी मायलेकींची मैलोन्मैल पायपीट

मोखाड्यात टंचाईच्या झळा; हंडाभर पाण्यासाठी मायलेकींची मैलोन्मैल पायपीट

Next

- रविंद्र साळवे 

मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही. नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या २४ नळ पाणी पुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना आदींमुळे टँकर मुक्त गावाची संख्या वर्ष निहाय वाढत चालली आहे. लांबच लांब पायपिट करुन हंडाभर पाणी मिळत असल्याने हाताला काम नको, खायला अन्न नको पण प्यायला पाणी द्या अशी आर्त हाक येथील आदिवासी गावकऱ्यांनी दिली आहे.

तालुक्यात जवळपास ५ मोठी धरणे असुन तेथून १२० किलो मीटर अंतरावर असणाऱ्या मुबंई शहराला पाणी पुरवठा होत आहे. मात्र, स्थानिक गाव पाडे पाण्याविना तहानलेलिच आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील ४६ गाव पाड्यात पाणी बाणीचे संकट निर्माण झाले असून दिवसाआड टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना १५ टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या गावातून टॅँकर मागणीचे प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे येऊन धडकत असल्याने प्रशासनाची देखील धावपळ उडत आहे.

उन्हाळ्याच्या सुरवातीला दरवर्षी उद्भवणाºया परिस्थिती वर कायम स्वरु पी तोडगा काढण्याचे शहाणपण मात्र कोणालाच सुचत नसल्याने गाव पाडे वासियांकडुन रोष व्यक्त केला जात आहे. गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाºय विहिरींपासुन टंचाई ग्रस्त गाव पाडे २०-२५ किलो मीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे टंचाई ग्रस्त नागरिकांना हातातली कामे सोडुन देऊन घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे तर टँकर चालु असलेल्या गाव पाड्यांतील जनतेला चातक पक्षा प्रमाणे टँकर ची दिवसभर वाट बघावी लागत असुन मोलमजुरी करु न पोटाची खळगी भरणार्या आदिवासी बांधवाची मोठी अडचण झाली आहे.

दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने संताप : राज्य शासनाने जव्हार मोखाडा हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. टंचाईग्रस्त गावपाड्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु असे असताना देखील तालुक्यातील कीनिस्ते, शेलमपाडा, धामोडी, पाथर्डी, डोंगर वाडी, वशिंद या गावपाड्यांना दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने येथील आदिवासीची पाण्यासाठी होणारी पायपीट आणखी वाढली आहे

पुढाऱ्यांवर रोष
आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून विजयाची गणिते जुळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून कंबर कसली जाणार आहे. परंतु गेल्या अनेक निवडणुकांच्या आश्वासनात येथील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. भूमिपुत्रांचेच्या हक्काचे पाणी मुबंईला पुरवले जाते परंतु स्थानिक पाणी टंचाई भोगत आहेत.
धरना लगत असलेल्या गावांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना नकरता टँकर लॉबीच्या घशात कोट्यवधी रु पये घालण्याचा वाझोटा प्रयत्न दरवर्षीच प्रशासनाकडून केला जात आहे. यामुळे पाण्याच्या प्रश्नावरु न पुढाºयांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: Scarcity of milk in the market: Mylakei's Melonmel Footpath for crispy water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.