पालघर जिल्ह्यातील रिक्षा बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 12:50am

पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांची पालघर येथे होणारी ‘पासिंग’ आता विरार येथे नेऊन नंतर ती सुमारे सव्वाशे किमी लांब असणा-या कल्याण येथे हलवली जाणार आहे.

हितेन नाईक/शशी करपे पालघर/वसई : पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांची पालघर येथे होणारी ‘पासिंग’ आता विरार येथे नेऊन नंतर ती सुमारे सव्वाशे किमी लांब असणा-या कल्याण येथे हलवली जाणार आहे. अत्यंत खर्चिक, त्रासदायक ठरणारे कल्याण हे ठिकाण बदलून पुन्हा ती पालघरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुरू करावे या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो रिक्षाधारकांनी शुक्र वार पासून बेमुदत बंद पुकारला आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्या नंतर सर्व विभागांची कार्यालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर मुख्यालयात सुरू करणे गरजेचे असताना ते विरार येथे सुरू करण्यात आले. परिवहन विभागाने ही आपल्याला पालघर मुख्यालयात कार्यालय व इतर पासिंग चाचणीच्या प्रक्रियेसाठी जागेची मागणीच केली नसल्याने शासन पातळी वरून त्याबाबत विचार करण्यात आलेला नसल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. पालघर पूर्वेला असलेल्या शासकीय विश्रामगृहामध्ये असलेल्या जागेत मागील २०-२५ वर्षांपासून तीन-सहा आसनी रिक्षा, मोटार -सायकल, टेम्पो, ट्रक आदी गाड्यांची पासिंग प्रक्रिया केली जात होती. ती आता बंद करून डहाणू पासून सुमारे ९२ किमी तर पालघर पासून ५५ ते ६० किमी अंतरावरील विरार येथे नेऊन ठेवण्यात आली होती. रिक्षांना पासिंगसाठी दिलेल्या ठिकाणाहून ३३ किमी प्रवासाची मर्यादा प्रादेशिक परिवहन विभागाने घालून दिलेली असतांना त्यांचा नियम मोडून रिक्षाधारकांना ६० किमी अंतरावरील विरार येथे जाण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. वेळेत पासिंग न केल्यास प्रति दिवस ५०रुपयांचा दंड ही आकारणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे फुकटचा भुर्दंड गरीब रिक्षाधारकाना सहन करावा लागणार आहे. त्यातच नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या अहमदाबाद-मुंबई महामार्ग वरून विरार गाठणे खर्चिक, मानसिक त्रासदायक व धोकादायक ठरणार असल्याचे रिक्षा युनियनचे म्हणणे आहे. आता तर विरार येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पासिंगची चाचणी प्रक्रिया कल्याण येथे हलविण्यात येणार आहे असे, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चालक-मालक सेनेचे अध्यक्ष मनोज घरत यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. त्यामुळे पालघर-डहाणू येथून १२५ किमी लांब कल्याण येथे गाड्या पासिंगला घेऊन जाणे सर्वच दृष्टीने खूपच त्रासदायक ठरणारे आहे. त्यामुळे बुधवारी पालघर मुख्यालयाच्या भूमीपूजनाला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आॅटो टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष केतन पाटील, उपाध्यक्ष सुनील जगताप आणि छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मनोज घरत, विजय किणी आदिंनी भेट घेऊन पालघर मध्येच प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरू करावे अशी मागणी केली. शुक्रवार पासून सुरू होणार्या बेमुदत रिक्षा बंद आंदोलनात पालघर, बोईसर, सफाळे, सातपाटी, डहाणू आदी भागातील हजारो रिक्षा बंद राहणार असल्याने रिक्षावर अवलंबून असणारे कामगार, विद्यार्थी, छोटे-मोठे विक्रेते, मत्स्यव्यवसायिक आदी वर मोठा विपरीत परिणाम होणार आहे. प्रवाशांचा मोठा भर एसटी ला उचलावा लागणार आहे.  

संबंधित

देहविक्री व्यवसायातून तिघींची सुटका, दलाली करणा-या घरमालकिणीला आणि २५ वर्षांच्या तरुणीला अटक
फेरीवाला नोंदणीत मराठींना डावलले? मीरा-भार्इंदरची घटना
झोपड्या येणार कराच्या कक्षेत : सर्वेक्षणासाठी कंत्राटावर नेमणार ३४ लिपिक
वांद्रे-कुर्ला संकुलात रंगली ‘पेटॅथॉन’
पालघरचा कंट्रोल ठाण्याकडेच, मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांचे काय झाले?

वसई विरार कडून आणखी

नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवकासाठी ४० अर्ज, उडणार मोठी झुंबड
अनेक वनराई बंधा-यांची गरज, विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी
मनसेची पुन्हा अमराठी पाट्यांवर वक्रदृष्टी; मराठीत पाट्या बदलण्यासाठी १५ दिवसांची मुदत
सिंगापुरात मराठीसाठी पाठपुरावा, महाराष्ट्रातून कवी, साहित्यिक अन् रसिकांची हजेरी
पश्चिम रेल्वेच्या गोंधळाने विद्यार्थी परीक्षेला मुकला

आणखी वाचा