मनसे इंजिनाची रिक्षाला पॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:17 AM2019-04-26T00:17:30+5:302019-04-26T00:18:46+5:30

पाठिंबा कुणाला?; कार्यकर्त्यांत संभ्रमच, पक्ष म्हणतो बविआला, कार्यकर्ते बुके देतात पंडितांना

Rickshaw Power of MNS engine | मनसे इंजिनाची रिक्षाला पॉवर

मनसे इंजिनाची रिक्षाला पॉवर

Next

बोईसर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना सत्तेवरून हटविण्यासाठी पक्षाची ताकद मोदी व शहा विरोधात उभी केली असून लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी बहुजन विकास आघाडी व तिचे उमेदवार बळीराम जाधव यांना पाठिंबा जाहीर केल्याने मनसेचे इंजिन महाआघाडीच्या रिक्षाची ताकद काहीशी वाढविणार असून ती शिवसेना-भाजप युती करता मारक ठरू शकते राजकीय व्यवस्थेला पूरक अशी मनसे हा पक्ष स्थापन केल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या २००९ साली घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये बोईसर विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचे माजी आमदार अविनाश सुतार यांना मनसेने उतरवले होते. त्या निवडणुकीमध्ये सुतार यांना तिसऱ्या क्रमांकाची १८ हजार १०४ (१३.१२ टक्के) मते मिळाली होती.

या निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्ष संघटना व अपक्ष असे मिळून एकूण १२ उमेदवार होते. त्यापैकी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विलास तरे यांना ५३ हजार ७२७ (३८.९५ टक्के ) मते मिळवून ते १३ हजार ७८ मताधिक्याने विजयी झाले होते तर शिवसेनेचे उमेदवार सुनील धानवा यांना दुसºया क्रमांकाची म्हणजे ४० हजार ६४९ (२९.४७ टक्के) मते मिळाली होती तर जनता दलाचे उमेदवार काळूराम धोदडे यांना ७ हजार ३६० (५.३४ टक्के) मते मिळाली तर उर्वरीत आठ उमेदवारांना सर्व मिळून अवघी १८ हजार ९९ मते मिळाली होती. सुतार यांना १८ हजार १०४ मिळालेली मते व तरे यांचे १३ हजार ७८ मतांचे मताधिक्य पाहता सेना व मनसे यांच्यामध्ये झालेल्या मत विभागणीचा फायदा तरे यांना होऊन त्यांनी विजय मिळवला होता. अशा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून युतीला कंबर कसावी लागणार आहे.

मात्र २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेने पालघर लोकसभेच्या अंतर्गत येणाºया पालघर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार जगन्नाथ वरठा यांना ३१४८ (१.९२ टक्के) मते , बोईसर : वसंत रावते ४५०३ (२.६३ टक्के) मते, डहाणू : विजय वाढीया २०८८ (१.३५ टक्के) मते, विक्र मगड : भरत हजारे ४७४३ (२.८७ टक्के) , नालासोपारा : विजय मांडवकर ३८६० (१.७१ टक्के) तर १३३- वसई : स्वप्नील नर २३२९ (१.२२ टक्के). या सहाही मतदारसंघात मोठ्या उमेदीने व अपेक्षेने मनसे ने उमेदवार रिंगणात उतरवले होते. परंतु त्या निवडणुकीमध्ये मनसेच्या उमेदवारांनी सपाटून मार खाल्ला होता सहा उमेदवार मिळून अवघी २० हजार ६७१ एवढी मते मिळाली होती.
पालघर लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा संघात मनसेच्या सहा उमेदवारांनी २० हजार ६७१ मिळवली होती ही खूप छोटी मतांची संख्या वाटत असली तरी लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीमध्ये पालघरचे खासदार म्हणून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी भाजपाचे चिंतामण वनगा यांचा १२३६० मतांनी पराभव केला होता.

२०१९ च्या निवडणूकीत पालघर लोकसभा मतदार संघाची निवडणूक बविआ व महाआघाडी आणि शिवसेना व भाजपा युतीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असून ही निवडणूक दोन्ही बाजूने अत्यंत प्रतिष्ठेची केली असल्याने ती अटीतटीची होणार हे निश्चित असून या मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार प्रचंड मताधिक्यानी नाही तर काही हजार मतांच्या फरकाने निवडून येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याने मनसेची मिळणारी मत ही बविआ करता बोनस ठरणार आहेत. या संदर्भात मनसे व बविआच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोईसरला बुधवारी (दि.२४) झाली त्या मध्ये राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे बविआ व महाआघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असून त्या नुसार मनसेचे पालघर (लोकसभा) जिल्हा प्रमुख कुंदन संखे व पदाधिकारी आणि मनसेच्या सैनिकांच्या जिल्हाभर बैठका होण्यास सुरुवात झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही बविआच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार असून आमचे जिल्ह्यात सुमारे ८ हजार पदाधिकारी व कार्यकर्ते असून जिल्ह्यात आमचे सुमारे ५० ते ६० हजार मतदार आहेत त्याचा फायदा बविआच्या उमेदवाराला होईल
-कुंदन संखे
पालघर (लोकसभा ) जिल्हा प्रमुख

मनसेचा नक्की पाठींबा कोणाला ?
नालासोपारा : मंगळवारी सकाळी गोखीवरे येथील मनसेच्या कार्यालयात हितेंद्र ठाकूर यांना ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि पालघरचे कुंदन संख्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन बिनशर्त पाठिंबा दिला.
बुधवारी संध्याकाळी वालीव येथील नगरसेवक प्रफुल पाटील यांच्या कार्यालयात महायुतीला पाठींबा देणारे श्रमजीवीचे संस्थापक, जनआंदोलन समितीचे अध्यक्ष आणि वसईचे माजी आमदार विवेक पंडित आल्यावर वसई विरार जिल्हाध्यक्ष जयेंद्र पाटील व मनसेचे माजी नगरसेवक प्रवीण भोईर यांनी पुष्पगुच्छ दिल्याचे फोटो वसईत गुरु वारी व्हायरल झाला.
त्यामुळे मनसेचा नक्की पाठींबा बविआला की महायुतीला या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे मनसेची दुटप्पी भूमिका असल्याचीही चर्चाही सध्या वसई तालुक्यात सुरू आहे.

विवेक पंडित हे मोठे नेते असून ते बुधवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास माझ्या कार्यालयात वडिलांना व मला भेटायला आले होते. माझे वडील जुने कट्टर शिवसैनिक आहे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार बविआला पाठिंबा दर्शवून त्यांचा प्रचार करत आहे. मोठे अनेक नेते कार्यालयात येतात. त्यावेळी त्यांना मान देणे गरजेचे असल्याने पुष्पगुच्छ दिला जातो. - प्रफुल पाटील, अपक्ष नगरसेवक व मनसे समर्थक, वसई

राज ठाकरेंच्या मनसेचा बविआला पाठिंबा असला तरी वसईच्या मनसेचा महायुतीला पाठींबा
- विवेक पंडित,माजी आमदार, वसई

Web Title: Rickshaw Power of MNS engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.