पारोळ : सातिवली स्मशानभूमीतील महापालिकेकडून सुरु असलेल्या शौचालयाच्या कामास भाजपा, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर ते काम बंद करण्याचे महापालिका आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. संघटना संतप्त असल्याने वालिव पोलिसांनी यशस्वी मध्यस्थीकरुन या प्रसंगातून मार्ग काढला.
महानगरपालिकेच्या प्रभाग जी वॉर्ड क्र. ७५च्या हद्दीतील वसई पूर्वेच्या महामार्गालगत असलेल्या सातिवली गावातील समशानभूमीच्या आवारात बी.ओ.टी. (बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा) तत्वावर सुलभ शौचालयाचे काम सुरु होते. त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते.
मेल्यानंतर तरी घाण व दुर्गंधीपासून मुक्ती द्या, असा सूर येथे उमटत होता. तसेच हिंदूंचीच स्मशानभूमी तुम्हाला शौचालय बांधायला मिळाली का? असा सवाल धार्मिक संघटनांनी उपस्थित केला होता.याबाबत शिवसेनेचे दत्ताभाऊ कुळे, भाजपाचे विश्वांभर चोपडेकर व ग्रामस्थांनी वेळोवेळी हरकत घेऊन तक्र ार दिली होती.
मात्र, तरीही काम सुरूच होते. त्यामुळे त्यांनी भाजपाचे जिल्हा सचिव राजेंद्र म्हात्रे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी स्मशानभूमीची पाहणी करून ग्रामस्थ, शिवसेना , विश्वहिंदू परिषद, बजरंग दलच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी शांततेत जमलेल्या शेकडो लोकांच्या सहभागातून एक शिष्टमंडळ वालिव पोलीस ठाण्याचे अधिकारी महेश पाटील यांना भेटले व त्यांना परिस्थितीची जाणिव करून दिली. (वार्ताहर)
पोलिसांनी केली यशस्वी मध्यस्थी

च्पोलिसांनी पाहणी करून शिष्टमंडळास पालिका आयुक्त लोखंडे यांची भेट घेण्यास सांगितले. ते याबाबत निर्णय देई पर्यंत शौचालयाचे काम सुरु न करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
च्याबाबत आयुक्तांच्या भेटीत शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन चालू असलेल्या शौचालयाचे काम त्वरीत थांबवून त्या ऐवजी बाजूस असलेले जुने शौचालय नव्याने बांधून देण्यात येणार असून व स्मशानभूमीचेही सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
च्त्यामुळे या परिसरातील मोठा तणाव अप्रिय घटना घडण्यापूर्वीच टाळण्यात पोलीस व महापालिका आयुक्त यशस्वी झाले.