विक्रमगडमध्ये गणपती कारखान्यांमध्ये रंगरंगोटीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:18 AM2018-08-20T03:18:59+5:302018-08-20T03:19:19+5:30

गणपतीच्या आॅर्डर वाढल्या असल्याची व्यापारी बंधूंची माहिती, जीएसटीमुळे किमती वाढणार

Rangrangli velocity in the Ganpati factories in Vikramgad | विक्रमगडमध्ये गणपती कारखान्यांमध्ये रंगरंगोटीला वेग

विक्रमगडमध्ये गणपती कारखान्यांमध्ये रंगरंगोटीला वेग

- राहुल वाडेकर

विक्रमगड : बाप्पाच्या आगमनाला आजपासुन फक्त २४ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने शहरातील गणपती कारखान्यांमध्ये लगबग पहावयास मिळत आहे. वाढलेली गणपतींची संख्या, पडणारा पाऊस आणि डेटलाईनच्या गणितामुळे रात्रंदिवस काम सुरुआहे.
या चित्रशाळांमध्ये गणेशाच्या विविध प्रकारातील सुंदर आणि आकर्षक अशा गणेशमुर्ती तयार केल्या जात असून त्या पाहाण्यासाठी व त्याची बुकींग करण्यासाठी आतापासुनच गणेशभक्तांची व विशेषकरुन शालेय विद्यार्थ्यांचीही गर्दी पहावयास मिळत आहे. विक्रमगडमधील काही चित्रशाळेत तयार मुर्ती आणुन त्यांना रंगरंगोटी केली जाते तर काही मुर्ती बनविल्या जातात. त्यामध्ये शाडूच्या मातीच्या मुर्तीही बनविल्या जातात. परंतु आताचे युग हे धावपळीचे व आधुनिक युग असल्याने प्लॅस्टर आॅफ पॅरीसची मुर्तीची मागणी जास्त असल्याचे येथील मुर्तिकार सांगतात.
तालुक्यातील अनेक ग्राहकांनी (गणेशभक्तांनी) चित्रांप्रमाणे बसलेल्या हुबेहुब गणेशमुर्तींची मागणी केली आहे़ त्यामुळे प्रत्येक ग्राहकांला आवडणाऱ्या गणेशमुर्ती या शाळेमध्ये बनविल्या जात आहेत. तुलनेने शाडुच्या मुर्तीची मागणी जरी कमी असली तरी ती बनविण्यासाठी जात वेळ खर्ची पडतो. शिवाय ती नाजूक असल्याने खूप सांभाळावे लागते. या मुर्ती बनविण्यास त्या सुकण्यास व आखणी करण्यास खूप वेळ लागतो व तसे कारगीरांचीही आवष्यकता असते़ त्यामुळे सध्या त्या आॅर्डर बूक करुनच केल्या जातात. यंदा गतवर्षी पेक्षा गणेशमुर्ती बनविण्याच्या साहित्यात, रंगांत दुपटीने भाव वाढ झाल्याने मुर्तींच्या किंमतीही वाढलेल्या पहावयास मिळणार आहेत.
१९८४ मध्ये मातीची एक गोण ४ रुपये किंमतीला मिळत होती, ती आता १००० रुपयात मिळत आहे. रंगाचे दर त्यावेळी १ रुपया ४० पैसे एक डबी होती ती आता ३०० रुपयाचे आसपास झाली आहे़ तर कारागीरही मिळत नसल्याने त्यांची मजुरी, वीज व साहित्यात झालेली महागाई तर गणेशमुर्तीना जीएसटी कर देखील द्यावा लागणार आहे़ दरम्यान त्याचा कोणताही परिणाम बुकींगवर झाला नसून ती वाढतच आहे.

प्लास्टर आॅफ पॅरिसचा बोलबाला तरी शाडूमूर्ती आॅन डिमांड
गेल्या काही वर्षीमध्ये बदलत्या काळानुरुप मातीत मुर्ती घडविणारे कारागीरच मिळत नसल्याची माहिती विक्रमगड येथील गणेशचित्र शाळेतील व्यापारी बंधुनी यांनी सांगीतले. त्यामुळे गुणतवणूक वाढली आहे. गणेशमुर्तीची किंमत ही कलावंताचे कौशल्य,त्यांचे नाव, काम करण्याची पध्दत आणि भाविकांची श्रध्दा यावर अवलंबुन असते. गत काही वर्षांमध्ये प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मुर्तीना मागणी वाढत आहे.
मात्र, कित्येक पटीने शाडूच्या मुर्तींना मागणी आहे़ शाडूच्या गणेशमुर्ती शास्त्र सम्मत व पर्यावरण पुरक असल्याने महाग असूनही त्यांची मागणी चांगली आहे. शहरातून व परिसरातून त्यांना चांगली मागणी आहे.

किंमती वाढणार : यंदाची महागाईची झळ बसत असल्याने त्याचा परिणाम मुर्तीसाठी लागणारी माती व रंगावर दिसत आहेत. साहित्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने साहजिकच गणेशमुर्तीच्या किंमती वाढल्याचे व्यापारी बंधुनी लोकमतला सांगितले.

Web Title: Rangrangli velocity in the Ganpati factories in Vikramgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.