पावसाळी पिकनिकी जिवावर बेतली; विरारमध्ये तलावात बुडून एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:02 PM2018-07-10T17:02:17+5:302018-07-10T17:03:06+5:30

विरार पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद

The rainy picnic killed one; dies drowning in a lake in Virar | पावसाळी पिकनिकी जिवावर बेतली; विरारमध्ये तलावात बुडून एकाचा मृत्यू 

पावसाळी पिकनिकी जिवावर बेतली; विरारमध्ये तलावात बुडून एकाचा मृत्यू 

Next

विरार -  डोंगरपाडा तलावात मुसळधार पावसात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी हि दुर्दैवी घडली आहे. राकेश खोत (वय - 30) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.

मागील तीन दिवसांपासून वसई विरारमध्ये पावसाने थैमान घातले आहे. अशातच तालुक्यातील सर्व तलाव, नदी-नाले,धरणे ओसंडून वाहत असताना सर्वत्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या पथकाकडून सावधानतेचा इशारा देण्यात येऊन देखील विरार डोंगरपाडा तलावात पोहण्यासाठी राकेश व त्याचा एक मित्र मंगळवारी सकाळच्या सुमारास गेला होता. तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांपैकी एकजण तलावात बुडाला. त्यानंतर भयभीत झालेल्या मित्राने झाल्या घटनेची माहिती संबधितांना कळविली. त्यानंतर घटनास्थळी विरार पोलीस व पालिका अग्निशमन दल दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून राकेशचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: The rainy picnic killed one; dies drowning in a lake in Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.