Prasad Mahadik merged in infinity | प्रसाद महाडिक अनंतात विलीन

वसई : भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या मेजर प्रसाद महाडिक यांना विरार येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी लष्करातील काही वरिष्ठ अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते हजर होते.
लष्करात कमांडो म्हणून कार्यरत असलेले मेजर प्रसाद महाडिक भारत चीन सीमेवर होते. रविवारी चीनच्या सीमेवर दारूखाना टेंप्रेचर चेक करताना, अचानक स्फोट होऊन त्यांचा अंत झाला होता. त्यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी विरार येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. त्यानंतर, संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.