आशेरी गडावर तळीरामांना दुर्गमित्रांनी चांगलेच चोपले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:16 AM2019-07-19T00:16:29+5:302019-07-19T00:16:41+5:30

कासा जवळील आशेरी गडावर मंगळवारी मद्यपान, दारूपार्टी करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना रंगेहाथ पकडून दुर्ग मित्रांनी चांगलेच चोपले व गडावरून हुसकावून लावले.

Potters have been tossed well by the villagers | आशेरी गडावर तळीरामांना दुर्गमित्रांनी चांगलेच चोपले

आशेरी गडावर तळीरामांना दुर्गमित्रांनी चांगलेच चोपले

Next

कासा : कासा जवळील आशेरी गडावर मंगळवारी मद्यपान, दारूपार्टी करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना रंगेहाथ पकडून दुर्ग मित्रांनी चांगलेच चोपले व गडावरून हुसकावून लावले. दरम्यान दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटनाचे पेव फुटते. हौशी पर्यटक तर मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात, त्यात जंगलातील गडकिल्ल्यांवर गर्दी होते. मुंबई अहमदाबाद महामार्गालगत मेंढवण गावाजवळचा शिवाजी महाराजांच्या काळातील आशेरी गड येथे चढण्यासाठी कठीण असला तरी अनेक पर्यटक तिथे जातात. मात्र आशेरी गडावर मंगळवारी आठ दहा पर्यटक, मद्यपान करून हुल्लडबाजी करत होते. काही वेळाने स्थानिक पर्यावरण प्रेमी तेथे आलेत. त्यांनी या हुल्लडबाज दारुबाज पर्यटकांना दम देऊन परतण्यास सांगितले. मात्र त्यांनी वाद घालण्यास सुरु करताचकाहींना चांगलाच चोप दिल्याने ते तात्काळ पसार झालेत.
दरवर्षी परिसरातील दुर्गाप्रेमी एकत्र येऊन आशेरी किल्ल्याची साफसफाई करतात. मागील वर्षी या गडावरील तीन टाक्या व दोन तलाव दुर्गमित्रांनी साफ केले होते. मात्र अशा प्रकाराने गडाचे पवित्र नष्ट होत आहे. पर्यावरण खाते व वनविभागाने गडावर सूचना फलक लावणे आवश्यक आहे. तसेच असे मद्यपान करणाºया पर्यटकांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक पर्यावरण प्रेमी करत आहेत. परंतु त्याकडे ना पुरातत्व खाते लक्ष देते ना पोलिस आणि जिल्हा प्रशासन लक्ष देते अशी अवस्था आहे.
>गडावर अशा प्रकारच्या मद्य पार्ट्या करणे चुकीचे आहे. त्यामुळे इतिहासकालीन गडांचे पवित्र नष्ट होते. त्यामुळे अशा पर्यटकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
- संतोष वझे, दुर्गप्रेमी

Web Title: Potters have been tossed well by the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.