तरुणीची फसवणूक करणारा ताब्यात,  गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 05:52 AM2018-04-15T05:52:31+5:302018-04-15T05:52:31+5:30

नालासोपारा येथील आपल्या मैत्रिणीला फिरण्याच्या बहाण्याने रिसॉर्टमध्ये नेऊन शितपेया मधून गुंगीचे औषध टाकून तिच्याशी जबाबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या उबेत शेख रा.मालाड या आरोपी विरोधात अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 In the possession of the cheating cheat, filed the complaint | तरुणीची फसवणूक करणारा ताब्यात,  गुन्हा दाखल

तरुणीची फसवणूक करणारा ताब्यात,  गुन्हा दाखल

Next

पालघर : नालासोपारा येथील आपल्या मैत्रिणीला फिरण्याच्या बहाण्याने रिसॉर्टमध्ये नेऊन शितपेया मधून गुंगीचे औषध टाकून तिच्याशी जबाबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या उबेत शेख रा.मालाड या आरोपी विरोधात अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ती मुलगी व तिचा मित्र आरोपी शेख यांची ओळख मालवणी येथील एका महाविद्यालयात झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांच्या चोरून चोरून भेटीगाठी होऊ लागल्या. या प्रियकराने आपण आपल्या एका मित्रांसह फिरायला जाऊ असे या प्रेयसीला सांगून मित्र व त्याची प्रेयसी आणि हे दोघे असे चार जण २३ मार्च रोजी अर्नाळा येथील एका रिसॉर्ट मध्ये फिरण्यासाठी गेले. तेथे उबेत याने एक रूम बुक करून आरोपीने आपल्या प्रेयसी कडे शारीरिक संबंधा ची मागणी केली. यावर प्रेयसीने नकार दिल्याने आरोपीने शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्या असहाय्यतेचा फायदा उचलीत संमती नसतांना जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केला. या उपर झाल्या प्रकारची अश्लील चित्रफीत बनवित कुणाकडे वाच्यता न करण्याचा दम दिला. या घडलेल्या प्रकारानंतर आरोपीत याने आपल्या प्रेयसीकडून २ लाख रु पयाची मागणी केली व पैसे न दिल्यास ही चित्रिफत सोशल मीडियावर दाखिवण्याची धमकी दिली. आपल्या मुळे घरच्यांची अब्रू जाऊ नये म्हणून तिने आपल्या वडीलांचेच एटीएम चोरले. आणि ते आरोपीच्या ताब्यात दिले. त्याने एटीएमद्वारे २ लाख १० हजाराची रक्कम काढल्याची माहिती मुलीच्या वडिलांना मिळताच त्यानी चौकशी सुरु केली तेव्हा आपले एटीएम कार्ड गायब झाल्याचे व घरातील कुणीतरी हे कृत्य केल्याचा संशय त्यांना आला. चौकशी अंती आपल्यावर गुदरलेला प्रसंग त्या मुलीने आपल्या वडिलांच्या कानी घातला. पुढे तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगाच्या घटनेचा वृत्तांत तिने आपल्या वडिलांना सांगताच त्यांनी आपल्या मुलीला सोबत घेऊन सरळ अर्नाळा पोलीस स्टेशन गाठले. १२ एप्रिल रोजी आरोपी विरोधात गुन्हा नोंद झाला असून आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक सी. एन. कोळेकर व सहकारी करीत आहेत.

Web Title:  In the possession of the cheating cheat, filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.