आमसभेमध्ये पोपटपंची कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:05 AM2018-04-23T03:05:01+5:302018-04-23T03:05:01+5:30

तरे आणि घोडा यांचे फक्त हो ला हो : औपचारिकता पार पाडावी तशी झाली सभा

Poppet handy in the General Assembly | आमसभेमध्ये पोपटपंची कारभार

आमसभेमध्ये पोपटपंची कारभार

Next

पालघर : अधिकाऱ्यांनी पाठांतर करून आलेल्या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना पालघरच्या आमसभेत देऊन औपचारिकता एकदाची पार पाडावी तशी पार पडली. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून या प्रश्नांची खरोखर दखल घेणार का असा सवाल अध्यक्ष आमदार विलास तरे यांना विचारला असता आश्वासनांपलीकडे आपण काही करू शकत नसल्याच्या भावना तालुक्यातील नागरिकांनी पालघर येथे माध्यमिक शिक्षक पतपेढीत आयोजित आमसभेत व्यक्त केल्या.

मंगळवारी पार पडलेल्या या आमसभेत शिक्षण, रस्ते, आरोग्य, वीज आदी प्रश्नावर लोकांनी बोट ठेवले व या विभागाबाबतीत आमच्या शंकांचे निरसन होत नसल्याचे अध्यक्ष आमदार विलास तारे व सह अध्यक्ष आमदार अमित घोडा यांच्या निदर्शनास आणून दिले. शिक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर तालुका शिक्षण खात्याकडून कोणीतरी प्रतिनिधी उत्तरे देत असल्याचे व तालुका शिक्षण अधिकारी वारंवार या सभेत हजर राहत नसल्याने त्यावर काय कारवाई होणार का? असा प्रश्न आमसभेत विचारला गेला असता त्यावर कडक प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करणार असल्याचे गट विकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी यावेळी सांगितले.
पुढे एडवण शाळेच्या शिक्षकाचा मुद्दा समोर आला. गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेला शिक्षक नसल्याने शाळेतील पटसंख्या कमी झाली असून शाळेतील मुले इतरत्र शिकण्यासाठी जात आहेत व ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे . शिक्षक नसल्याने या शाळेचा पट घसरून तो १८४ वरून १२४ पर्यंत आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. शिक्षणापासून मुले वंचित रहात असल्याने याला जबाबदार कोण? याचेही उत्तर शिक्षण विभागाला देता आले नाही. मुद्दामून या विषयावर चर्चा होणार म्हणून गटशिक्षणाधिकारी चौधरी गैरहजर राहिले असा आरोप उपस्थितांनी केला.
वेऊर, नवली, पालघर मधील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या या आर्थिक फायद्यासाठी जवळपासच्या शाळेत गोल गोल फिरवल्या जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. या दोन्ही आमदारांनी पालघर तालुक्यातील शिक्षणाच्या घसरलेल्या दर्जा कडे लक्ष देण्याची मागणी केली. तेव्हा अध्यक्षांनी यासाठी विशेष समिती नेमून त्यात जनतेमार्फतच प्रतिनिधी घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे तरे यांनी उपस्थितांना सांगितले. सभेत पंचायतीच्या कार्यक्षेत्रात झालेल्या विकास कामाचा आढावा व न झालेल्या कामाची माहिती, लोकांचे वैयक्तिक प्रश्न, अडचणी आदीं बाबत खात्याच्या अधिकाºयांनी उत्तरे देणे अपेक्षित असताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाठांतर केल्याप्रमाणे संबंधित अधिकाºयांनी देण्याचा प्रयत्न झाला. कामे प्रगती पथावर आहेत, चौकशी चालू आहे, कारवाई करण्यात येईल अशी मोघम उत्तरे देऊन नागरिकांची बोळवण करण्यात आली. प्रत्यक्षात गेल्या सभेत आलेल्या प्रश्नांची शहानिशाच येथे झाली नाही आणि त्यात आश्चर्य म्हणजे अधिकाºयांनी दिलेल्या उत्तरांना दोन्ही आमदारांनीही दुजोरा दिला आणि सभेची औपचारिकता एकदाची पार पडली.

सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागावर चर्चा होताना काही ग्रामपंचायतीच्या गावात रस्ते अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम, मासवन ते निहे हा रस्ता नुकताच करण्यात आला मात्र, काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्र ार तेथील नागरिकांनी केली. यावरही पाहणी करू, ठेकेदारावर कारवाई करू असे मोघम उत्तर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी दिली. मात्र, गेल्या वर्षीही तक्र ारी केल्या आहेत. त्यावर कारवाई काय झाली याचे उत्तरही मिळाले नाही. लोकप्रतिनिधी होईल, करू, करण्यात येईल अशी आश्वस्त भाषा वापरत असल्याने नागरिक नाराज झाले.

अधिकाºयांकडून तांत्रिक उत्तरे नागरिक संतापून गेले निघून
मोरेकुरण - दापोली पालघर रस्ता चोरट्या रेतीची वाहतूक मुळे खराब झाल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सभेच्या निदर्शनास आणून दिले व रस्ता करून मिळावा अशी मागणी केली. तेव्हा नेहमीप्रमाणे मनुष्यबळ कमी आहे, तलाठी कमी आहेत अशी उत्तरे संबंधित अधिकाºयांनी दिली. महसूल विभागास जमीन एकत्रीकरण मध्ये झालेल्या चुकांची दुरु स्ती करण्यासाठी शेतकºयांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात तहसीलदार महेश सागर यांनी केले. रेतीची चोरटी वाहतूक यावरही चर्चा रंगली. चोरट्या वाहतूक वाल्यानं दंड करन ९० लाखाची वसुली करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बंदर विभागावर चर्चा होताना सातपटी समोरील समुद्रात अरवाना जेट्टी प्रस्तावित आहे त्याला मच्छिमारांच्या विरोध असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. मात्र सातपाटी, मुरबे, खाडीत रेती काढण्यासाठी परवानगी देऊन अरवाना बंदराला चालना दिल्याची तक्र ार करण्यात आली. आशा अनेक विषयांवर चर्चा होऊन रात्री ८ वाजता आमसभा संपली. आणि नागरिक संताप व्यक्त करून निघून गेले.
 

Web Title: Poppet handy in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर