जव्हार बसस्थानकात प्रदूषित पेयजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 04:19 AM2019-04-02T04:19:42+5:302019-04-02T04:19:57+5:30

पाण्याच्या टाकीचा स्लॅब तुटल्याने पडते घाण : बरेच दिवस पाणी बदलत नसल्याने येते दुर्गंधी

Polluted drinking water in Javar bus stand | जव्हार बसस्थानकात प्रदूषित पेयजल

जव्हार बसस्थानकात प्रदूषित पेयजल

Next

हुसेन मेमन

जव्हार: जव्हार-मोखाडा या तालुक्यांतील प्रवाशांच्या सोयीसाठी जव्हार हे एकमेव बस स्थानक आहे. मात्र, या स्थानकात प्रवाशांना पाण्यासाठी पाणी मिळत नसल्याने, पाण्यासाठी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होत आहेत. बस स्थानकात असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये वेळोवेळी पाणी टाकले जात नाही. त्यातच टाकीच्या मागील बाजूस असणारा स्लॅब पडाल आहे. त्यामुळे टाकीत कचरा पडून पाणी प्रदुषित होत आहे.

दोन्ही तालुक्यातील प्रवाशांसह शेकडो विद्यार्थी येथुनच प्रवास करतात. उन्हाळ्याच्या तलखीमुळे तहाण लागल्यावर ते हेच पाणी पितात. टाकीतील पाणी नियमित बदलले जात नसल्याने त्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्याही तक्रारी आहेत. हा थेट आरोग्याशी खेळ सुरु असल्याने या प्रकरणी महाराष्टÑ राज्य एस.टी. महामंडळाचे मुंबई सेंट्रल कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले त्यांना विद्यार्थी या बाबतची वास्तविकता सांगणार आहेत.
जव्हार व मोखाडा या आदिवासी तालुक्यांत एसटी सेवे शिवाय अन्य कुठलेही प्रवाशाचे साधन नाही. त्यामुळे या बस स्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. तसेच, याच स्थानकातून जव्हार- नाशिक शिर्र्डी- ठाणे- मुबंई पालघर कल्याण या ठिकाणी बसची ये-जा सुरु असल्याने गर्दीचे बस स्थानक आहे. मात्र, या बसस्थानकात प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. तसेच जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके असून येथील बहुतांस प्रवाशी हे २० रु पयांची पाणी बॉटल घेऊन पिऊ शकत नाही. तसेच, स्थानकाच्या आजुबाजुचे हॉटेलवाले त्यांना पाणी देण्यासाठी मज्जाव करीत असल्याचे प्रवाशांना सांगितले. त्यामुळे जव्हारच्या बस स्थानकात ऐन उन्हाळयाच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांचे हाल सुरु आहेत.
प्रवाशांकडून पिण्याच्या पाण्यासंदर्भात संताप व्यक्त झाला की, कधीकाळी टँकरने पाणी टाकले जाते. तेही काही तासांत संपून जाते. त्यातच पाणी कमी असल्याने उन्हामुळे टाकीतील पाणी उकळून पाण्याचा दुर्गंध येतो. बस स्थानकातील पाणी टंचाईबाबत आगार व्यावस्थापकांकडे चौकशी केली असता, आगार व्यावस्थाक रागारागाने बोलून प्रवाशांना उडवून लावतात. म्हणून प्रवाशांनी आपली कैफियत कुणाकडे मांडायची हा प्रश्न आहे. या बस स्थानकात बरेच प्रवाशी अशिक्षित असल्याने त्यांनी पाण्यासाठी मोर्चे काढायचे का असा सवाल विचारला जात आहे.

जव्हारच्या बस स्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी पाणी नाही. आम्हाला बऱ्याचदा चार ते पाच तास बसची वाट पहावी लागते, परंतु भर उन्हात पिण्यासाठी पाणी नाही. एसटी महामंडळाला सांगूनही त्या बाबत कोणतेही पाऊल उचलेले जात नाही.
-शिवा भसरा, प्रवाशी.
काही दिवसातच पाण्याच्या टाकीची दुरु स्ती करायची आहे. तोपर्यंत पिण्याच्या पाण्याचा टँकर हाच पर्याय आहे.
- सरिता पाटील, आगार व्यावस्थापक.
 

Web Title: Polluted drinking water in Javar bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.