राजकीय समीकरणामुळे निवडणुकीत उमेदवारांना चिंता मतविभागणीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 06:11 AM2018-05-11T06:11:01+5:302018-05-11T06:11:01+5:30

डहाणु लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या २८ मे ला पोट निवडणुक होत आहे़ त्यामुळे या मतदार संघात सध्यस्थित बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे.

 Political equation raises concern among candidates in elections | राजकीय समीकरणामुळे निवडणुकीत उमेदवारांना चिंता मतविभागणीची

राजकीय समीकरणामुळे निवडणुकीत उमेदवारांना चिंता मतविभागणीची

googlenewsNext

तलवाडा - डहाणु लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या २८ मे ला पोट निवडणुक होत आहे़ त्यामुळे या मतदार संघात सध्यस्थित बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतीम दिवस होता त्यामुळे आजपासुनच निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे़
अनुसुचित जमातीकरीता राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आप-आपल्या ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत़. त्यामुळे डहाणु लोकसभेतून नव्याने निर्माण झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात शहरी व ग्रामीण अशी मत विभागणी होण्याची चिन्हे दिसत आहेत़ यामध्ये प्रामुख्याने भाजपा-शिवसेना आमने सामने, बहुजन विकास आघाडी, कॉग्रेस-राष्टÑवादी, माकप अशी पंचरंगी लढत बघावयास मिळणार आहे. मात्र, खरी लढत भाजपा व बहुजन विकास आघाडी यांचेमध्ये अपेक्षित आहे़
परंतु उमेदवारांनी मतदारांवर कितीही प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला तरी मतांची विभागणी व स्थानिक राजकारण यावरच उमेदवारांचा टिकाव लागणार आहे़ त्यामुळे हा गड कोण काबीज करण्यात यशस्वी ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे़ परंतु, तत्पुर्वी सर्वच राजकीय पक्ष आपले श्रेष्ठत्व सिध्द करु लागले आहे़ हे आज शेवटच्या दिवशी भरण्यांत आलेल्या उमेदवारी अर्जां वरुन दिसुन आले़
सेनेकडून श्रीनिवास वनगा, भाजपाकडून राजेंद्र गावित, कॉँॅगे्रसकडुन दामु शिंंगडा, बविआकडून बळीराम जाधव, तर माकपाकडून किरण गहला यांनी गुरुवारपासुनच आपला प्रचार सुरु केल्यान लोकसभा पोट निवणुकीत प्रत्येक मताला किंमत आली आहे़
डहाणु लोकसभा मतदारसंघाचा काही भाग असा मिळून हा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्याने उमेदवार नव्या चेहऱ्याचा दिसणार अशी मतदारांना अपेक्षा होती परंतु जुनेच चेहरे समोर येत असल्याने मतदारांना हवे असलेले घडलेले नाही़ त्यामुळे पुर्वी लोक प्रतिनिधी म्हणुन मतदारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे़ त्यांच्या स्थानिक विकास कामाच्या जोरावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहाणार आहे़ मात्र या पंचरंगी लढतीत मत विभागणीची चिंता येथील उमेदवारांना भेडसावत आहे़ दरम्यान, सर्वच पक्षांनी प्रचारावर भर दिला आहे.

शहरी भागामध्ये बविआची ताकद
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीने जयत तयारी केलेली आहे़ कार्यकर्त्यांच्या बैठका गुरुवारपासुनच सुरुच झाल्या आहेत़ यासुंपुर्ण लोकसभा मतदार संघात साडेसतरा लाख मतदार असुन बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या वसई, नालासोपारा व बोईसर या तिन विधानसभा मतदार क्षेत्रात दहा लाखाहुन अधिक मतदार आहेत़ ही बाब निवडणुकीत जमेची बाजु ठरल्यास त्यांना फायदा होऊ शकेल.

कॉग्रेससाठी संघर्ष तरी लोकांना ताकदीचा पर्याय
या संपुर्ण मतदार संघात कॉगे्रसची हवी तशी बांधणी नसल्याने कॉगे्रससाठी ही निवडणुक कठीण परीक्षा ठरणार आहे. मात्र, राष्टÑवादी कॉग्रेस ही निवडणुक स्वबळांवर जिंकू शकत नसल्याने त्यांनी पाठींंबा दर्षविला आहे. मात्र कॉगे्रसकडे कार्यकर्ता व मतदार बांधणीला हातामध्ये जास्त वेळ नसल्याने निवडणुकीच्या रिंगणात त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे़ दरम्यान, मोदी आणि भाजपाला ताकदीचा पर्याय ठरत असल्याने देश पातळीवरील राजकारणात कॉँग्रेस चर्चेमध्ये आहे.

भाजपा आपली संपूर्ण ताकद एकवटणार
वाढवन बंदर, सुपर हायवे, बुलेट ट्रेन या मुद्यांना सामोरे जाणाºया भाजपाकडे सध्या कोणतीही लाट नसली तरी जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये संघ परिवार व अंगीभूत संघटनांची बांधणी पक्की आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगाच्या पुत्राने सेना प्रवेश केल्याने सहानुभूतीची लाट नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने आगामी काळात प्रचाराच्या निमित्ताने मोठ मोठे नेते, मंत्री रणधुमाळीत दिसणार आहेत.

माकपाकडे टक्कर देण्याची ताकद
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद सध्या या लोकसभा मतदार संघात वाढु लागली आहे़ या भागातील महत्वाच्या समस्यांवर व प्रश्नांवर होत असलेल्या आंदोलनांसाठी (आरचासंहितेपुर्वी) मोठी गर्दी जमत होती. त्यामुळे या आदिवासी मतदार संघात आपला उमेदवार उभा करुन माकपा इतरांना टक्कर देण्याची ताकद ठेऊन आहे.

Web Title:  Political equation raises concern among candidates in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.