Police's stern look at Talairam | तळीरामांवर पोलिसांची करडी नजर

वसई : ३१ डिसेंबरला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वसई विरार परिसरात पोलिसांनी शुक्रवारपासूनच नाकाबंदी सुरु केली आहे. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, बीट मार्शल, दामिनी पथकांसह साध्या वेषातील पोलीस आणि राज्य राखीव पोलील दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
वसई विरार परिसरात ६५ पोलीस अधिकारी आणि ४५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या, बीट मार्शल आणि दामिनी पथकांची गस्त जारी केली आहे. वाहतूक पोलिसांनी तर शुक्रवारपासून तळीरामांच्या तपासणीला सुरुवात केली आहे. सहा ब्रीथ अ‍ॅनलायझरच्या साहय्याने मद्यपींची तपासणी केली जाणार असून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी लगेचच गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली. स्थानिक पोलिसांच्या सोबतीला वाहतूक पोलिसांनी हायवे, आगाशी येथील ओलांडा नाका, बाभोळा नाका, वसंत नगरी सर्कल, साईनाथ नगर विरार, बोळींज नाका याप्रमुख स्थानी नाकाबंदी केली आहे. याठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रिसॉर्ट, हॉटेल्स, मॉल परिसरावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. विना परवाना पार्टी सुरु असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सर्वच पार्ट्यांना डीजे नाकारण्यात आला आहे.

डीजेच्या तालावर मस्ती करणाºयांना चाप लावण्यात येणार आहे. पार्टीच्या आयोजकांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

समुद्रकिनारी खुलेआम मद्यप्राशन करणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. मुलींची छेडछाड आणि चोºया रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेषातील पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत.


पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना


अनिरु द्ध पाटील
बोर्डी : ३१ डिसेंबेर तसेच नववर्षाच्या अनुषंगाने डहाणूला येणाºया पर्यटक आणि स्थानिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्याचे डहाणू उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी लोकमतला सांगितले.
या कार्यालयाच्या क्षेत्रात डहाणू, घोलवड आणि तलासरी या तीन पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. त्यापैकी डहाणू आणि घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गतचा परिसर सागरी आहे. ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागताला येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. या वर्षी शनिवारपासून येथील हॉटेल आणि रेस्टॉरंट फुल्ल झाली आहेत. त्या अनुषंगाने वाहतूककोंडी आणि सुरक्षात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी तीन दिवसांपूर्वीच हॉटेल व्यवसायिकांची बैठक बोलावून त्यांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय रस्ते सुरक्षेला विशेष महत्व देण्यात आले असून तपासणी नाके आणि पेट्रोलिंगवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना टाळण्यासाठी संशयित वाहनचालकांची ब्रीथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे. शिवाय सागरी पर्यटनासाठी येणाºयांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
स्थानिक विरु द्ध परगावतील पर्यटक यांच्यात वाहतूक कोंडी आणि पार्किंगवरून वाद उद्भवू नये याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. पंधरा अधिकारी आणि ७५ पोलिसांंसह दुचाकी तसेच चारचाकी वाहने असतील. गैरप्रकार आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.