कोतवालपदाच्या अर्जासाठी लूट, आदिवासींसाठी ५०० तर ओबीसींसाठी एक हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 12:26am

पालघर जिल्हयातील तालुका पातळीवर कोतवाल पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यासाठी करावयाच्या अर्जासाठी आदिवासी उमेदवारांकडून पाचशे रुपये

वसई : पालघर जिल्हयातील तालुका पातळीवर कोतवाल पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यासाठी करावयाच्या अर्जासाठी आदिवासी उमेदवारांकडून पाचशे रुपये तर इतर मागासवर्गींयासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. पालघर जिल्हयातील पालघर तालुक्यासाठी १०, वसई तालुक्यासाठी २३, विक्रमगडसाठी ५, जव्हारसाठी ७, मोखाड्यासाठी ३, तलासरीसाठी ९ आणि डहाणूसाठी ८ मिळून एकूण ७५ कोतवाल पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिये द्वारे भरती करण्यात येणार आहे. ७५ पैकी अवघ्या बारा जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर बहुसंख्या जागा अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती महिला, इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव आहेत. यात निवड होणाºया उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने अनेक कुटुंबे आर्थिकदृष्टया दुर्बल गटातील आहेत. याच कुटुंबातील हजारो तरुण-तरुणी कोतवाल पदासाठी अर्ज करणार आहे. मात्र, अर्जासाठी अनुसूचित जमातीसाठी पाचशे रुपये आणि इतर मागासवर्गींयासाठी एक हजार रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. या कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहता अवघे पाच हजार रुपये मानधन मिळणाºया कोतवाल पदासाठी इतके शुल्क आकारणे योग्य नाही, अशी तक्रार शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संबंधित

ठाण्यात उलटे टांगून मारल्याने चोरट्याचा मृत्यू
सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणा-याला अटक, नागपूर पोलिसांची कारवाई
डोंबिवलीत रस्त्यांवर पार्क होणा-या वाहनांवर आकारले जाणार पैसे? १० डिसेंबर रोजी फ प्रभाग समिती घेणार निर्णय
शिवसेनेकडून महापौर दालनाचा ताबा, विरोधी पक्ष नेते पदावरील प्रलंबित नियुक्तीमुळे शिवसेना संतप्त
अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदी मनिषा वाळेकर विजयी तर उपनगराध्यक्षपदी अब्दुल शेख यांची बिनविरोध निवड

वसई विरार कडून आणखी

खानिवडेत माकडांची दहशत, वनखात्याचे रेस्क्यू आॅपरेशन फेल
जव्हार प्रतिष्ठान व भाजपाची युती, जव्हारच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी
पाम गावाच्या हद्दीतून ८०० गुरे गेली चोरीस, सीसीटीव्हीत झाले रेकॉर्ड
एकोणचाळीस ग्रा.पं. च्या निवडणुका जाहीर, २६ डिसेंबरला मतदान
कॅथॉलिक बँकेने धर्मगुरुंना सदस्यत्व नाकारले

आणखी वाचा