पालघर लोकसभेसाठी तिरंगी लढत; माकपाच्या पाठिंब्याने बविआची ताकद वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 12:03 AM2019-03-24T00:03:35+5:302019-03-24T00:04:10+5:30

अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़त्याप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून जवळ जवळ राजकीय वर्तळातील उमेदवारांची निश्चिती होताना दिसत आहे़

Palghar tries to contest Lok Sabha polls; With the support of CPI (M), the strength of the Bahavi will increase | पालघर लोकसभेसाठी तिरंगी लढत; माकपाच्या पाठिंब्याने बविआची ताकद वाढणार

पालघर लोकसभेसाठी तिरंगी लढत; माकपाच्या पाठिंब्याने बविआची ताकद वाढणार

Next

विक्रमगड: अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़त्याप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून जवळ जवळ राजकीय वर्तळातील उमेदवारांची निश्चिती होताना दिसत आहे़ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहिर केल्याने त्याची ताकद वाढणार आहे़
त्यामुळे आता पालघर लोकसभेत सध्यस्थित भाजपा-शिवसेना युती,राष्टÑ्वादी-कॉग्रेस आघाडी, व बविआ-माकपा अशी प्रबळ तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत व तशी शक्यता राजकीय वर्तळात वर्तविली जात आहे़ दरम्यान काही दिवसांपासून राजेंद्र गावित बविआच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरत होती.
मात्र गावित यांनी बविआमध्ये जाण्याची शक्यता फेटाळली आहे़ राष्ट्ीय पक्ष सोडून कोणी स्थानिक पक्षात जाईल का असे सांगून गावित यांनी या वृत्तांचे पूर्णपणे खंडन करीत मुख्यमंत्र्यांचे पालघर लोकसभेच्या जागेसाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले़ तिरंग लढत झाल्यास खरी लढत ही भाजपा-शिवसेना युती व बविआ-माकप या दोन्ही उमेदवारमध्ये होवुन ते पुन्हा एकदा आमने-सामाने ठाकतील व या दोघांत काटें की टक्कर बघावयास मिळणार असल्याचे दिसण्यांत येते़ कारण आजच्या परिस्थिती नुसार पोटनिवडकीच्या मतांच्या आकडेवारी वरुन भाजपा-शिवसेना युतीकडे त्यांच्या एकत्रित मतांची बेरीज केली तर ५ लाख १५ हजार ९९२ मते होतात़ तर बविआकडे स्वत:ची २ लाख २२ हजार मते व माकपाची ७१ हजार ८८७मते अशा एकूण २ लाख ९४हजार ७२५ मतांची बविआकडे जुळवणूक झाली आहे. त्यात कॉगे्रसची ४७ हजार ७१४ मते जमा बेरीत ३ लाख ४२ हजार ४३९ पर्यतच पोहचते़
उर्वरीत १ लाख ७३ हजार ५५३ मतांचा फरक तोडण्यासाठी बविआला युतीच्या किमान ९० हजार मते आपल्याकडे खेण्यासाठी संघर्श करावा लागेल. मात्र हा मतदार संघ शिवसेनेला सोडल्याची चर्चा असल्याने भाजपमधील संभाव्य नाराजी, पालघर शिवसेनेची पालघर नगरपरिषद निवडकीतील मोठी बंडखोरी व राजेंद्र गावित यांना मानणाऱ्यांच्या मनातील नाराजीचासुर याचा उपयोग करुन बविआला फायदा होण्याची शक्यता आहे़

दृष्टिक्षेपात राजकारण
२०१८ ची पोटनिवडणुक बहुजन विकास आघाडीने फारशी गांभीर्याने न घेतल्याने बविआची हक्कांची मते शिवसेनेस व भाजपात विभागली गेली तसेच यामध्ये कॉगे्रस तर खूपच दुर होते व राष्टÑ्वादीची मते देखील शिवसेना व भाजपात विभागली गेली. राजेंद्र गावितांच्या उमेदवारीने देखील भाजपाला फायदा झाला़ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या मतदारांना आपल्याकडे वळविल्यामुळे आणि ही पोटनिवडणुक प्रतिष्ठेची झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घातल्याने भाजपाला ही बाजी मारता आली़ पालघर लोकसभा मतदारसंघातील डहाणू, तलासरी,जव्हार व विक्रमगड तालुक्यातील काही भागात माकपाचा प्रभाव आहे़

Web Title: Palghar tries to contest Lok Sabha polls; With the support of CPI (M), the strength of the Bahavi will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.