पालघरमध्ये नवे ७२ हजार मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:52 AM2019-04-22T00:52:07+5:302019-04-22T00:52:26+5:30

सर्वाधिक मतदार नालासोपारा तर सर्वात कमी विक्रमगडमध्ये

Palghar has new 72 thousand voters | पालघरमध्ये नवे ७२ हजार मतदार वाढले

पालघरमध्ये नवे ७२ हजार मतदार वाढले

Next

पालघर : पालघर लोकसभा मतदार संघात ३१ मार्च पर्यंत झालेल्या नवीन नोंदणीत ७२ हजार ३१४ नवीन मतदारांची नोंद करण्यात आली असून आता नव्या मतदार यादी नुसार या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या १८ लाख ८५ हजार २९७ एवढी झाली आहे. त्यात पुरु ष ९ लाख ८९ हजार तर महिला ९ लाख ९६ हजार १८६ तर अन्य तृतीयपंथी १११ असल्याची अंतिम नोंद करण्यात आली आहे.

२९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ९ एप्रिलपर्यंत नवीन मतदारांची नोंद करण्या बरोबरच मृत पावलेल्या मतदारांचे नाव कमी करण्याची प्रक्रि या निवडणूक निर्णय अधिकाºयाकडून राबविण्यात आली होती. जिल्ह्यातील सहा विधानसभा निहाय मतदान केंद्रातर्गत १ जानेवारी ते ९ एप्रिल २०१९ दरम्यान वाढलेल्या मतदारांची ५४ हजारांची वाढ झाल्यानंतर पालघर लोकसभा निवडणुकीत सहभागी मतदारांची अंतिम संख्या जाहीर करण्यात आली आहे.

पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा व वसई अशा सहा विधानसभा मतदार संघांपैकी नालासोपारा विधानसभेत सर्वाधिक ४ लाख ८७ हजार ५६० मतदारांची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक कमी मतदार संख्या विक्र मगड मतदार संघात २ लाख ६४ हजार १३२ इतकी नोंदविण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असलेल्या आणि त्यांचे प्राबल्य असलेल्या बोईसर, नालासोपारा व वसई या तीन मतदार संघातच १० लाख ८० हजार १० मतदारांची नोंद झाल्याने एकूण मतदार संख्येच्या ५७ टक्के एवढी मतदार संख्या या मतदार संघात समाविष्ट आहे. तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत २१ नी वाढ झाली असून ती १११ झाली आहे तर लष्कराशी संबंधित ३०७ मतदारांची नोंद करण्यात आलेली आहे.

पालघर लोकसभा अंतर्गत डहाणू विधानसभा क्षेत्रात पुरु ष १ लाख ३६ हजार १०६ तर महिला १ लाख ३३ हजार ८७४ अन्य ८ असे एकूण २ लाख ६९ हजार ९८८ मतदारांची नोंद करण्यात आली असून तर मतदार केंद्रे ३२७ आहेत. विक्र मगड विधानसभा क्षेत्रात पुरु ष १ लाख ३३ हजार ७५३, महिला १ लाख ३० हजार ३७९ असे एकूण २ लाख ६४ हजार १३२ मतदारांची नोंद असून एकूण ३४८ केंद्रे आहेत. पालघर विधानसभा क्षेत्रात पुरु ष १ लाख ३७ हजार ८३८ तर महिला १ लाख ३३ हजार ३१३ अशी एकूण २ लाख ७१ हजार १६७ मतदारांची नोंद असून अन्य १६ तर ३२२ केंद्र आहेत. बोईसर विधानसभा क्षेत्रात पुरु ष १ लाख ६० हजार ७९९, महिला १ लाख ३७ हजार ०९२ असे एकूण २ लाख ९७ हजार ९१५, अन्य २४ तर एकूण ३५३ मतदार केंद्रे आहेत, नालासोपारा विधानसभेत पुरु ष २ लाख ६८ हजार ७००, महिला २ लाख १८ हजार ८०४ अन्य ५६ असे एकूण ४ लाख ८७ हजार ५६० मतदार असून एकूण मतदान केंद्रे ४८९ आहेत, वसई विधानसभा क्षेत्रात पुरु ष १ लाख ५१ हजार ८०४ , महिला १ लाख ४२ हजार ७२४ अन्य ७ असे एकूण २ लाख ९४ हजार ५३५ मतदार असून एकूण मतदानकेंद्रे ३३८ आहेत. जिल्ह्यात एकूण २ हजार १७७ मतदान केंद्रे आहेत.
 

Web Title: Palghar has new 72 thousand voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.