विरार कार्यालयात टेस्ट ट्रॅक अभावी जुन्या वाहनांचे पासिंग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 02:58 AM2018-07-01T02:58:24+5:302018-07-01T02:58:31+5:30

पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या जुन्या वाहनांची पासिंग विरार आर्.टी.ओ. कार्यालयात टेस्ट ट्रॅक नसल्याने बंद करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांना ५० किमीवर असलेल्या कल्याण येथील कार्यालयात पाठविले जात आहे.

Old vehicle passes off due to lack of test track at Virar office | विरार कार्यालयात टेस्ट ट्रॅक अभावी जुन्या वाहनांचे पासिंग बंद

विरार कार्यालयात टेस्ट ट्रॅक अभावी जुन्या वाहनांचे पासिंग बंद

googlenewsNext

वसई : पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या जुन्या वाहनांची पासिंग विरार आर्.टी.ओ. कार्यालयात टेस्ट ट्रॅक नसल्याने बंद करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांना ५० किमीवर असलेल्या कल्याण येथील कार्यालयात पाठविले जात आहे.
या संदर्भात राज्य सरकारने त्वरीत लक्ष घालून जुन्या वाहन चालकांना दिलासा द्यावा असे निवेदन महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष विनायक निकम आणि त्यांच्या शिष्टमंडळाने उप- प्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांना दिले आहे.
हा प्रश्न त्वरीत मार्गी लागला नाही, तर पालघर जिल्ह्यातील सर्व वाहनचालक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा हि निकम यांच्या वतीने आर.टी.ओ ला नुकताच देण्यात आला.
पासिंगसाठी कल्याण गाठावे लागत असल्याने जिल्हावासियांच्या वेळ, पैसा याचा अपव्यय हो असून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासही होत असून त्यांची मोठी दमछाक होते आहे.
आधीच कल्याण हे शहर वसई सारखेच मोठ्या महापालिकेचे शहर असल्याने याठिकाणी सुद्धा हजारो वाहने पासींग करण्यासाठी गर्दी करत असतात, त्यामुळे एकदा त्याठिकाणी गेल्यावर साधारण पंधरा ते वीस दिवसां नंतरची तारीख मिळते. परिणामी वाहनचालकास एका खेपेच्या कामासाठी तब्बल दोन ते तीन वेळा हेलपाटे मारावे लागतात.
कल्याण येथे वाहने पासींग करण्यासाठी आठवडयातून एकच रविवारचा दिवस मिळत असल्यामुळे वाहनांची पासिंग वेळीच होऊ शकत नाही. आणि ती वेळीच झाली नाही तर अशी वाहने रस्त्यावर येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद ठेवावा लागतो.
वाहनांच्या दैनंदिन धंद्यावर या टेस्ट ट्रॅक बंदचा परिणाम होत असून वाहनचालक स्वत:च्या गाडीच्या कर्जाचा हप्ता ही वेळेवर भरू शकत नाही, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुहेरी कात्रीत सापडलेल्या वाहन चालकाने गाडी रस्त्यावर आणल्यास अपघात झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अथवा विमा त्यास मिळू शकणार नाही.त्यामुळे या समस्येस नेमके जबाबदार कोण? असा सवालच चालकांनी विचारला आहे.

भूखंडाच्या मालकीचा
मुद्दा न्यायप्रविष्ट
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात आर्.टी.ओ. कार्यालयासाठी गवराईपाडा, गोखिवरे पूर्व येथे राज्यशासनाने भूखंड दिलेला आहे. परंतु आज ही ह्या जागेच्या मालकीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थीतीत पालघर जिल्ह्यातील वाहन चालकां वरती या समस्येची कुºहाड किती दिवस टांगती राहणार आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे उत्तर मात्र आरटीओकडे नाही.

आरटीओ अनिल पाटीलांची चलाखी
(या मोबाईल क्रमांकावर इनकमिंग कॉल्स ची सुविधा उपलब्ध नाही .)
वसईतील विविध माध्यमाच्या पत्रकारांकडून विरार आर.टी.ओ संदर्भात प्रतिक्रि या विचारण्यासाठी काही वेळा मोबाईलवर फोन केले जातात. मात्र आता विरार आर टीओ अनिल पाटील यांनी आपला मोबाईल हा केवळ आऊटगोर्इंग मध्ये ठेवला असून फक्त पत्रकारांचे येणारे फोन हे बंद केलेल्या इनकमिंग मोडमध्ये ठेवले आहेत.

Web Title: Old vehicle passes off due to lack of test track at Virar office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.