जुन्या पेन्शन योजनेसाठी केले मुंडन , तलासरीमध्ये शिक्षकांना आक्रोश : १९८२-८४ चे धोरणच कर्मचारी हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:19 AM2017-12-18T01:19:02+5:302017-12-18T01:19:17+5:30

१ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेतील कर्मचाºयांना महाराष्ट्र शासनाने अन्यायकारक अंशदायी पेंशन योजना लागू केलेली आहे. ती बंद करून १९८२-८४ ची जुनी निवत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने मुंडण व आक्र ोश महामोर्चाचे आयोजित करण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी तलासरी तालुक्यातील शिक्षक कर्मचाºयांनी सामुहिक मुंडण करुन रविवारी शासकीय धोरणाचा निषेध केला.

 Old Munde Pension for Old Pension Scheme, Teachers Dispute in Thalassari: The Policy of 1982-84 | जुन्या पेन्शन योजनेसाठी केले मुंडन , तलासरीमध्ये शिक्षकांना आक्रोश : १९८२-८४ चे धोरणच कर्मचारी हिताचे

जुन्या पेन्शन योजनेसाठी केले मुंडन , तलासरीमध्ये शिक्षकांना आक्रोश : १९८२-८४ चे धोरणच कर्मचारी हिताचे

Next

तलासरी : १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेतील कर्मचाºयांना महाराष्ट्र शासनाने अन्यायकारक अंशदायी पेंशन योजना लागू केलेली आहे. ती बंद करून १९८२-८४ ची जुनी निवत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने मुंडण व आक्र ोश महामोर्चाचे आयोजित करण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी तलासरी तालुक्यातील शिक्षक कर्मचाºयांनी सामुहिक मुंडण करुन रविवारी शासकीय धोरणाचा निषेध केला.
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेतील कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना ऐवजी नवीन अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेत समाविष्ट कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा शासनाने दिलेली नाही.
एखादा कर्मचारी मयत झाल्यास त्या कर्मचाºयाचे संपुर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्या अनेक घटना या महाराष्ट्राने अनुभवल्या आहेत. यासाठी सर्वप्रथम १४ डिसेंबर २०१५ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर सुमारे साठ हजार कर्मचाºयांनी, त्यानंतर १५ मार्च २०१६ रोजी मुंबई अधिवेशनावर एक लाख कर्मचाºयांनी आक्रोश मोर्चा काढून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. पुढे शासनाने मृत कर्मचाºयांना आर्थिक मदत करण्यासाठी समिती नेमली. परंतु कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना नाकारली. त्याचवेळी मात्र उत्तराखंड, राजस्थान उत्तरप्रदेश आदी राज्यांनी आपल्या एनपीएस धारक कर्मचाºयांना कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू केली. इतर राज्ये जुनी पेन्शन योजना लागू करत असताना महाराष्ट्र शासनाला डीसीपीएस /एनपीएस धारक मृत कर्मचाºयांच्या परिवारांच्या अश्रूंची दखल घेण्याची गरज वाटत नाही. २००५ नंतर शासन सेवेतील कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना बंद करून शासनाचे समाधान झाले नसून त्यांना १२ व २४ वर्षे पूर्ण होताच मिळणाºया वेतनश्रेणीसाठी जाचक अटी टाकल्या आहेत. या सर्व अन्यायकारक बाबींचा निषेध करण्यासाठी, शासनाने पुन्हा एकदा आपल्या मागण्यांवर विचार करावा याकरिता रविवारी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मुंडण आक्र ोश महामोर्चा आयोजित केले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून जवळपास ५० हजार कर्मचारी नागपूर येथे १९८२-१९८४ ची जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी यासाठी मुंडण आक्र ोश महामोर्चात सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने या मोर्चाला संपुर्ण महाराष्ट्रातुन मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आपल्या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी तलासरी तालुक्यातील जवळपास ३०० कर्मचारी यांनी सामुहिक मुंडण केले. त्यामुळे तालुक्यात ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ याची चर्चा रंगताना दिसली. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या मोर्चाला प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक परिषद, शिक्षक सहकार संघटना यांनी पाठिंबा दिला.

Web Title:  Old Munde Pension for Old Pension Scheme, Teachers Dispute in Thalassari: The Policy of 1982-84

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक