यापुढे पालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 07:04 PM2018-05-24T19:04:23+5:302018-05-24T19:04:23+5:30

ज्या पक्षासाठी चिंतामण वणगा यांनी यातना सहन केल्या, पक्ष वाढवला तो पक्ष वणगा ना विसरला तर पक्षात प्रवेश पाहिजे असल्यास थैली दाखवा पक्षात प्रवेश देतो असा प्रवृत्तीचा हा पक्ष असून माझी थैली मात्र ही जीवाभावा ची माणसे आहेत, असे उदगार शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोखाडा येथील श्रीनिवास वणगा यांच्या प्रचार सभेदरम्यान काढले

Now the Palghar Lok Sabha constituency of Shiv Sena - Uddhav Thackeray | यापुढे पालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे 

यापुढे पालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे 

Next

- रविंद्र सााळवे 

मोखाडा - ज्या पक्षासाठी चिंतामण वणगा यांनी यातना सहन केल्या, पक्ष वाढवला तो पक्ष वणगा ना विसरला तर पक्षात प्रवेश पाहिजे असल्यास थैली दाखवा पक्षात प्रवेश देतो असा प्रवृत्तीचा हा पक्ष असून माझी थैली मात्र ही जीवाभावा ची माणसे आहेत, असे उदगार शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोखाडा येथील श्रीनिवास वणगा यांच्या प्रचार सभेदरम्यान काढले. तर कोचाळे गावाची पाणी टंचाई ची समस्या मिटविण्याचे आदेश बृहमुबंई महानगर पालिकेला दिले असुन दोन चार महिन्यात हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल.सद्याच्या मतदाना बरोबर च भविष्य कालीन पिढीच्या हातात सुध्दा शिवरांयाचा पविञ भगवा हवा आहे असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले.जर श्रीनिवास ला भाजपा ने उमेदवारी दिली असती तर मी भाजपा चा प्रचार करायला आलो असतो माञ भाजपा ने " गरज सरो वैद्य मरो " अशी परिस्थिती निर्माण केल्यानेच शिवसेने ने श्रीनिवास ला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला तर कॉग्रेस मधुन भाजपा मध्ये आलेल्या गाविता ना विधानसभेची उमेदवारी दीड वर्षा पुर्वी च घोषित होते तर मग श्रीनिवास ची लोकसभेची उमेदवारी घोषित करायला उशिर का ? असा प्रश्न देखील उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला त्याचप्रमाणे ' भाजपा चा विजय झाला तर चिंतामण वणगांना आंनद होईल तर मग श्रीनिवास चा पराभव झाला तर वणगांना आनंद होईल का ? अशा खालच्या पातळीवर जावुन भाजपा नेते प्रचार करत असल्याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला तसेच २८ तारखेला ई व्ही एम या मतदान यंञा मध्ये मतदान केल्यानंतर कोणती लाईट पेटते याची खातरजमा करुन च मतदान केंद्रा बाहेर पडण्याचे आवाहन यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली या प्रचार सभे दरम्यान मोखाड्यातील भाजपा चे माजी सभापती जयराम निसाळ, गंगाधर निसाळ, मतिन शेख, प्रविण दुर्गुडे, विजय कोठेकर, व शेकडो कार्यकर्त्यानी सेनेत प्रवेश केला या सभेस ठाणे जिल्ह्याचे पालकमंञी एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार अनिल देसाई, आरोग्य मंञी डॉ.दिपक सांवत, उदयबंधु पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, तालुका प्रमुख अमोल पाटील, व हजारो च्या संख्येने कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..

Web Title: Now the Palghar Lok Sabha constituency of Shiv Sena - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.