आता नागरिकांना पोस्टाचा ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 04:55 AM2018-04-22T04:55:04+5:302018-04-22T04:55:04+5:30

परिसरातील लोकांनी या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक इंगळे यांनी केले.

Now citizens 'post' | आता नागरिकांना पोस्टाचा ‘आधार’

आता नागरिकांना पोस्टाचा ‘आधार’

Next

पालघर : पोस्टात आधार कार्ड केंद्र व अद्ययावतीकरणाच्या केंद्रामुळे बाहेरील खाजगी व खर्चावू ठिकाणी जाण्याची लोकांना गरज पडणार नसल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी पालघर पोस्ट कार्यालयात नव्याने सुरु झालेल्या आधार कार्ड केंद्र व अद्ययावतीकरण केंद्राच्या उदघाटनप्रसंगी केले. यावेळी पालघरचे पोस्ट अधीक्षक विलास इंगळे, प्रभारी पोस्ट मास्तर अशोक वानखेडे, लेखक व साहित्यीक प्रकाश पाटील, डाकघर कर्मचारी व पोस्टाचे ग्राहक उपस्थित होते.
परिसरातील लोकांनी या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक इंगळे यांनी केले. लोकांनी पोस्टाशी व्यवहार करावा जेणेकरून त्याना त्याचा चांगला लाभ होईल. लवकरच पोस्ट आपल्या दारी असा नाविन्यपूर्ण उपक्र म पोस्टामार्फत राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी येथे दिली. त्याअंतर्गत बँकेच्या व्यवहाराप्रमाणे लोकांना पोस्टात व्यवहार करता येणे शक्य होईल. याही पुढे ग्राहकांना पोस्टातून पैसे काढावयाचे असल्यास वा भरावयाचे असल्यास त्यांना येथे येण्याची गरज लागणार नाही तर ते पैसे ग्राहकांना थेट त्यांचा घरूनच जमा करता किंवा काढता येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पालघरसोबत जिल्ह्याच्या कार्यकक्षेत येत असलेल्या सर्व २६ उप-विभागीय पोस्ट कार्यालयांमध्ये अशी केंद्रे स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पोस्टाच्या या आधार कार्ड केंद्रातून मनीषा जैन यांनी लग्नानंतरचे नाव अद्ययावतीकरण करून पहिल्या सेवेचा लाभ घेतला. निशुल्क नवीन आधार नोंदणीसाठी नाव नोंदविण्यात येणार असून कार्डातील अद्ययावतीकरणासाठी ३० रु पयाचे शुल्क आकारले जाणार आहे.

येथे घ्या झटपट आधारकार्ड
जिल्ह्यातील या पोस्ट उप-विभागात आधार कार्ड नोंदणी व अद्ययावतीकरण केंद्र पुढील प्रमाणे निर्माण करण्यात आलेली आहेत. आगाशी, वसई, वसई रोड, बोईसर, भार्इंदर पूर्व व पश्चिम, चिंचणी, डहाणू, डहाणू रोड, जव्हार, मोखाडा, मीरा रोड, नालासोपारा पूर्व, सोपारा, पालघर मुख्य कार्यालय, वसई (आय.इ ), विरार पूर्व व पश्चिम, तारापूर पावर पोस्ट, तारापूर औद्योगिक पोस्ट, तारापूर, तलासरी, मनोर, मीरा, वाडा, उंबरपाडा

Web Title: Now citizens 'post'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.