नीरज भटनागरला तीन दिवसांची पो. कोठडी; गुडगावमधून घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:38 AM2018-03-20T01:38:23+5:302018-03-20T01:38:23+5:30

आपल्या एजंट मार्फत जमा केलेल्या रोख रक्कमेवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून लाखो रु पये घेऊन फरार झालेल्या कळस महिला पतसंस्था पालघरचे मुख्य संचालक निरज विरेंद्र भटनागर रा.सफाळे यांस सफाळे पोलिसांनी गुडगाव (दिल्ली) येथून अटक केली. सोमवारी त्याला पालघर न्यायालयाने २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Neeraj Bhatnagar gets three days poem The closet In possession of Gurgaon | नीरज भटनागरला तीन दिवसांची पो. कोठडी; गुडगावमधून घेतले ताब्यात

नीरज भटनागरला तीन दिवसांची पो. कोठडी; गुडगावमधून घेतले ताब्यात

Next

पालघर: आपल्या एजंट मार्फत जमा केलेल्या रोख रक्कमेवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून लाखो रु पये घेऊन फरार झालेल्या कळस महिला पतसंस्था पालघरचे मुख्य संचालक निरज विरेंद्र भटनागर रा.सफाळे यांस सफाळे पोलिसांनी गुडगाव (दिल्ली) येथून अटक केली. सोमवारी त्याला पालघर न्यायालयाने २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पालघरच्या हुतात्मा स्तंभा शेजारील एक इमारतीत आरोपी निरज भटनागर व त्याची पत्नी सिमी यांनी कळस महिला पतसंस्थेची नोंदणी पालघरच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेकडे करून कार्यालय थाटले. रोख रक्कमेवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून तालुक्यात अनेक एजंट नेमून लाखो रु पये जमा केले. पहिल्या काही महिन्यात ग्राहकांना जास्त व्याज देऊन त्यांनी आपल्या पतसंस्थे बद्दल विश्वास निर्माण केला. त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी बांधवसह शहरी भागातील अनेक ग्राहकांनी हजारो रु पयांच्या ठेवी पतसंस्थेमध्ये जमा केल्या. साधारण पणे ५० लाखांच्यावर ही रक्कम जमा करण्यात आली असावी असा पोलिसांचा कयास आहे. लोकांनी आपल्या गुंतविलेल्या रक्कमेची मुदत पूर्ण झाल्यानंतर पैशाच्या मागणीला आरोपीने टोलवाटोलवी करण्यास सुरु वात केली. मात्र, ग्राहकांच्या मागणीचे प्रमाण वाढू लागल्या नंतर त्याने सफळ्यातील आपले घर आणि पालघर मधील कार्यालयाला टाळे ठोकून पोबारा केला. ह्या पतपेढीत गुंतवणूक करणाऱ्या डॉक्टर श्रीकांत बुद्धे यांनी ६० हजाराची फसवणूक झाल्याची तक्र ार पालघर पोलिसात नोंद केली. हे प्रकरण सफाळे पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी निमिल गोयल ह्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर ह्यांच्या कडे सूत्रे सोपवली.

अन् धागेदोरे आले हाती
तपासा अंती आरोपीने एक ग्राहकाच्या बँक खात्यात काही रक्कम दिल्ली येथून जमा केल्याची माहिती मिळवली. त्या आधारे पोलिसांनी दिल्ली गाठली.
बँकेतून सर्व डिटेल्स घेतल्यावर आरोपी गुडगाव मधील एक कंपनीत काम करीत असल्याच्या माहिती वरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मात्र त्याची पत्नी पळून जाण्यात यशस्वी झाली.

Web Title: Neeraj Bhatnagar gets three days poem The closet In possession of Gurgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.