दलित ठेकेदाराला बिल्डरची जातीवाचक शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:49 AM2019-07-19T00:49:16+5:302019-07-19T00:49:27+5:30

खुपरी येथील संजोग सुरेश पाटील या बिल्डरने आपल्याकडे ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या दिनेश उर्फ दिलीप आहिरे यांनी कामाचे ऊर्वरित पैसे मागितले

Native contractor has a nullity of the builder | दलित ठेकेदाराला बिल्डरची जातीवाचक शिवीगाळ

दलित ठेकेदाराला बिल्डरची जातीवाचक शिवीगाळ

Next

वाडा : तालुक्यातील खुपरी येथील संजोग सुरेश पाटील या बिल्डरने आपल्याकडे ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या दिनेश उर्फ दिलीप आहिरे यांनी कामाचे ऊर्वरित पैसे मागितले म्हणून फोन करून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपी संजोग विरूध्द वाडा पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेकेदार आहिरे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील असून रोजगाराच्या निमित्ताने ते वाडा तालुक्यातील कुडूस येथे अनेक वर्षांपासून राहतात. बिल्डर संजोग पाटील यांच्या इमारतींच्या बांधकामांवर ते नियमितपणे सेंट्रींगचे काम ठेकेदार पध्दतीने करत आहेत. आपल्या कामाच्या मजुरीपैकी राहिलेल्या ४५ हजार ८०० रुपयांची मागणी केल्याने संतापलेल्या बिल्डर संजोग पाटील यांनी त्यांना मोबाइलवरून जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीने भेदरलेल्या आहिरे कुटुंबीयांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनावणे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Native contractor has a nullity of the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.