नगर-कल्याण फक्त ३ तासांत, अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:52 AM2019-01-21T00:52:47+5:302019-01-21T00:52:53+5:30

पुणे-ठाणे, पालघर, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या व पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले

Nagar-Kalyan in just 3 hours, complete survey of Kalyan Railway via Ahmednagar-Malsege | नगर-कल्याण फक्त ३ तासांत, अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण

नगर-कल्याण फक्त ३ तासांत, अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण

googlenewsNext

राजुरी : पुणे-ठाणे, पालघर, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या व पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले असून एकूण २६ रेल्वेस्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मार्गावर रेल्वे सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये; तसेच शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व हा मार्ग सुरू झाल्यास नगर ते कल्याण अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येणार आहे.
गेल्या पंचवीस वर्षांपासून रखडलेला अहमदनगर - कल्याण रेल्वे मार्गाला नुकतीच परवानगी मिळाली असून नगर व पुणे जिल्ह्यातील शेतमाल मुंबई येथे अत्यंत कमी वेळेत पोहोचवू शकणाºया या रेल्वे मार्गाची अनेक वर्षांपासून मागणी होती. तो व्हावा, यासाठी माळशेज रेल्वे कृती समितीने मोठा संघर्ष केलेला आहे. हा मार्ग अहमदनगर येथे सुरू होणार असून नगर, भाळवणी, धोत्रे, वासुंदे, शिंदेवाडी, काटाळवाडी, माळवाडी, पादरवाडी, ओतूर, जुन्नर रोड, मढ, केबिन, देवरूखवाडी, नागतार सफरकेबीन, डाहरी मिल्वे, मुरबाड, पाटगाव, आपटी कांबा रोड, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी व कल्याण असा मार्ग असणार असून ही वरील गावांची नावे रेल्वे स्थानक म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहेत.
रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणाºयांनी हा रेल्वे मार्ग पूर्णपणे फायद्यात असेल असा निर्वाळा दिला आहे. सध्या या तांत्रिक सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल आला असला तरी अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर रेल्वे बोर्डासमोर ठेवण्यात येणार आहे. मार्गाला मान्यता मिळण्याची फक्त औपचारिकता बाकी असल्याने हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे पाहता हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर याचा फायदा विशेषकरून ग्रामीण भागातील शेतकºयांना तसेच मुंबई या ठिकाणी कामासाठी असलेल्या कामगारांना होणार आहे. कारण शेतकरीवर्ग आपला शेतीमाल दररोज मुंबईला विकण्यासाठी नेऊ शकतो, कारण शेतीमाल मुंबईला एसटीने घेऊन जायचा असेल तर सहा ते सात तास लागतात व यासाठी खर्चही खूप येतो हाच माल रेल्वेने नेला तर अवघ्या दीड ते दोन तासात पोहोचत असून खर्चही खूप कमी येणार आहे, तसेच मुंबईला नोकरीसाठी असलेले ग्रामीण भागातील जे लोक आहेत, ते दररोज जाऊन येऊन ती करू शकतील व त्यांच्या खर्चातदेखील बचत होणार आहे. तसेच या मार्गावर असणारा माळशेज घाट सध्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण असून रेल्वेच्या सोयीमुळे तेथील पर्यटन व्यवसाय अधिक फुलणार आहे व जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी तालुका पर्यटन तालुका व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती व त्यात त्यांना यशदेखील आले आहे व तालुका पर्यटन क्षेत्रात मोडला आहे. तसेच या विभागाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले, की हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर कसा होईल, यासाठी सतत पाठपुरावा केलेला आहे तसेच लवकरच मान्यतेसाठी प्रयत्न चालू आहे. यामुळे आता त्याच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते? याकडे चारही जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
>शेतकºयांना मिळणार मोठी बाजारपेठ
हा माळशेज रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर ठाणे पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांसाठी असलेल्या बाजारपेठ जवळ येणार आहेत.तसेच अहमदनगरमार्गे पुढे औरंगाबादमार्गे विशाखापट्टणम हा मार्गदेखील जवळ येणार आहे. त्यामुळे हा मार्ग या चारही जिल्ह्यांतील शेतकºयांसाठी विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार असून महत्त्वाचा ठरेल.

Web Title: Nagar-Kalyan in just 3 hours, complete survey of Kalyan Railway via Ahmednagar-Malsege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.