प्रकल्पबाधित भूमिपुत्रांकरिता डहाणूमध्ये मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:39 AM2018-04-17T02:39:52+5:302018-04-17T02:39:52+5:30

मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग आणि बुलेट ट्रेनकरिता भूमिपुत्रांची जमीन बळकावणारे मोदी सरकार आमिष आणि दडपशाहीचा वापर करीत आहे.

MNS movement in Dahanu for project-bound BHP | प्रकल्पबाधित भूमिपुत्रांकरिता डहाणूमध्ये मनसेचे आंदोलन

प्रकल्पबाधित भूमिपुत्रांकरिता डहाणूमध्ये मनसेचे आंदोलन

Next

बोर्डी : मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग आणि बुलेट ट्रेनकरिता भूमिपुत्रांची जमीन बळकावणारे मोदी सरकार आमिष आणि दडपशाहीचा वापर करीत आहे. त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून त्यांच्या न्याय हक्काकरीता सोमवारी महाराष्ट्र नविनर्माण सेनेने डहाणू प्रांत कार्यालयात निदर्शने करून प्रांत अधिकारी आंचल गोयल यांना निवेदन दिले.
सोमवारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रकल्प बाधित निवडक शेतकºयांची बैठक प्रांत कार्यालयात सुरू होती. त्या वेळी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. या प्रकल्पकरिता हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून अनेकांवर विस्थापित होण्याची वेळ ओढवणार आहे. परंतु मोजक्याच शेतकºयांची मनधरणी करून प्रकल्पाला विरोध नसल्याचा भास जिल्हाधिकाºयांसह सर्व शासकीय यंत्रणा निर्माण करीत असल्याचा आरोप मनसे तर्फे करण्यात आला. आदिवासींना पैशांचे आमिष दाखवून तसेच दडपशाहीच्या मार्गाचा वापर करून जमिनी बाळकावण्याचा घाट शासनाने घातल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संकेत प्रांत अधिकाºयांच्या माध्यमातून शासनाला देत असल्याचे जाधव म्हणाले. या प्रकल्पातून स्थानिक पातळीवर रोजगार देण्याच्या भुलथापा देऊ नका, उपलब्ध भौगोलिक संसाधनांचा वापर करून रोजगाराच्या संधी वाढवा, भूमीपुत्रांना विस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यास लढा देणार असल्याचे मनसेचे माजी पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी सांगितले. या वेळी मोदी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्गाकरिता डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ३,८०९ आदिवासी खातेदारांची जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. त्या मध्ये ३२,४३१ वनझाडे आणि ४२,५५१ फळझाडे अशा एकूण ७२,९८२ झाडांचा बळी जाणार असून त्यामुळे पर्यावरणाचा ºहास होणार आहे. या झाडांच्या तोडी करीता पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नसल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिकांना विस्थापित करण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पांचा स्थानिकांना काडीमात्र फायदा नसल्याने त्यांचा विरोध आहे. या करिता मनसे त्यांच्या बाजूने लढणार आहे.
- अविनाश जाधव, जिल्हाअध्यक्ष, मनसे, ठाणे

Web Title: MNS movement in Dahanu for project-bound BHP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.