रेशनचा २२ गोण्या गहू मनसेने पकडला, बचत गटाच्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:50 AM2017-11-10T00:50:00+5:302017-11-10T00:50:07+5:30

दातिवरे येथील माता रमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री मोहन वर्तक यांच्या रेशिनंग दुकानातील ११ क्विंटल (२२ गोणी) गहू टेम्पो मधून काळाबाजारात

MNS caught 22 grams of ration, and filed a complaint against two women of the group | रेशनचा २२ गोण्या गहू मनसेने पकडला, बचत गटाच्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

रेशनचा २२ गोण्या गहू मनसेने पकडला, बचत गटाच्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

पालघर: दातिवरे येथील माता रमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री मोहन वर्तक यांच्या रेशिनंग दुकानातील ११ क्विंटल (२२ गोणी) गहू टेम्पो मधून काळाबाजारात विक्र ी करण्यासाठी नेत असतांना स्थानिकांसह मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा तोे पकडून केळवे सागरी पोलिसांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिला विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दातिवरे येथील रमाबाई महिला बचत गटाच्या गोदामातून रात्री १0 च्या सुमारास एका टेम्पोत धान्य भरले जात होते. त्याचा संशय येऊन ग्रामस्थ आणि दातिवरे येथे मनसेचे पालघर तालुका उपाध्यक्ष चेतन वैद्य, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, केळवा विभाग अध्यक्ष संदीप किणी, उपविभाग अध्यक्ष सचिन किणी, हेमंत घोडके, अध्यक्ष हर्षल पाटील, सचिन भोईर, वैभव वसईकर, शिवसेना सरपंच ज्योती तामोरे आणि मनसे उपसरपंच विजया राऊत, ग्रामपंचायत सदस्य गौतम वर्तक, रविंद्र भोईर, तसेच पंकज पाटील, प्रशांत ठाकूर, परेश भोईर, ग्रामस्थ आणि मनसे सैनिकांनी हा टेम्पो रंगेहात पकडून मालासह केळवा सागरी पोलीस ठाण्यात जमा केला. या गव्हाची किंमत २६,४९९ रूपये असून, पुरवठा अधिकारी तडवी यांनी केलेल्या या कारवाईत माता रमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री मोहन वर्तक आणि सचिव रिया रूपेश राऊत यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये केळवे पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. निकृष्ट माल ग्राहकांच्या माथी मारणे, माल न देताच तो दिल्याची कागदोपत्री नोंद करणे, रॉकेल आणि धान्य काळ्या बाजारात विकणे असा गैरप्रकार रेशनिंग दुकानांतून चालतो, हे महसूल प्रशासनाला चांगले माहीत असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा स्पष्ट आरोप मनसेचे पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांनी केला आहे. या भ्रष्ट रेशनींग दुकानदाराचा परवाना रद्द करण्या बाबतची मागणी तालुका पुरवठा अधिकारी तडवी यांच्याकडे केली आहे.

Web Title: MNS caught 22 grams of ration, and filed a complaint against two women of the group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.