मनसेची पुन्हा अमराठी पाट्यांवर वक्रदृष्टी; मराठीत पाट्या बदलण्यासाठी १५ दिवसांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 06:38 PM2017-11-23T18:38:57+5:302017-11-23T18:39:05+5:30

मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील अनेक दुकानांच्या पाट्या अद्यापही अमराठीत असुन त्या त्वरीत मराठीत बदलण्यात

MNS again curvilinear on Amber Patti; 15 days to change the plates in Marathi | मनसेची पुन्हा अमराठी पाट्यांवर वक्रदृष्टी; मराठीत पाट्या बदलण्यासाठी १५ दिवसांची मुदत

मनसेची पुन्हा अमराठी पाट्यांवर वक्रदृष्टी; मराठीत पाट्या बदलण्यासाठी १५ दिवसांची मुदत

Next

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील अनेक दुकानांच्या पाट्या अद्यापही अमराठीत असुन त्या त्वरीत मराठीत बदलण्यात याव्यात, अशी मागणी वजा इशाय््रााचे निवेदन देण्याची मोहिम मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सुरु केली. त्यासाठी त्यांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह दुकान निरीक्षकांनाही त्याचे निवेदन देण्यात आले आहे. महाराष्टÑात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा आहे. अशातच व्यावसायिक आस्थापनांसह दुकानदारांनी आपापल्या कार्यालयासह दुकानांवरील दर्शनी भागात ठळकपणे मराठी भाषेत नाव लिहिणे अपेक्षित आहे. तरीदेखील बहुतांशी अमराठी दुकानदारांनी व व्यावसायिकांनी आपापल्या कार्यालयांसह दुकांनावरील पाट्यांवरुन मराठी भाषेला बगल देत इंग्रजी भाषेतच आस्थापनांची नावे लिहिल्याचे निदर्शनास आले आहे. यापुर्वी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या अमराठी पाट्यांवर हल्लाबोल करुन मराठी भाषेत दुकानांच्या पाट्या लिहिण्यास व्यावसायिकांना भाग पाडले होते. यानंतरही मीरा-भार्इंदर मधील अनेक व्यावसायिकांनी दुकानांवर मराठी ऐवजी इंग्रजी भाषेत नाव लिहिल्याचे दिसुन येत असल्याने त्या अमराठी पाट्यांविरोधात पक्षाध्यक्षांच्या निर्देशानुसार आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतल्याचे सुर्वे यांनी सांगितले. त्यानुसार शहरातील सर्व अमराठी पाट्या असलेल्या व्यावससायिकांना त्वरीत मराठी भाषेत पाट्या बदलण्याचे निवेदन देण्याची मोहिम मनसेने सुरु केली. या निवेदनाद्वारे त्या व्यावसायिकांना येत्या १५ दिवसांत अमराठी पाट्या मराठी भाषेत न बदलल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. तत्पुर्वी पालिकेच्या परवाना विभागानेही व्यावसायिक परवाना मिळविण्यासह त्याचे नुतनीकरण करण्यासाठी आलेल्या व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनेवरील दर्शनीभागात असलेल्या पाट्या मराठी भाषेतच लिहिण्याची सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी मनसेने पालिका आयुक्तांकडे निवदेनाद्वारे केली आहे. यामुळे शहरातील अमराठी पाट्यांच्या मुद्यावर मनसे पुन्हा एकदा जोर धरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मराठी विरोधी मोहिमेत शहर सचिव नरेंद्र पाटोळे, उपशहराध्यक्ष शशी मेंडन, हेमंत सावंत, विभागीय सचिव सुशिल कदम, सतिश जाधव, विभागाध्यक्ष सचिन पोपळे, विजय फर्नांडिस, विशाल चव्हाण, उपविभागाध्यक्ष प्रकाश शेलार, आनंद हिंदळेकर, रमाकांत माळी, शाखाध्यक्ष मनिष कामटेकर, मंगेश कांबळी, वद्यार्थी सेनेचे रॉबर्ट डिसोझा, शेरा पुरोहित आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Web Title: MNS again curvilinear on Amber Patti; 15 days to change the plates in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.