आमदार, विरोधी पक्षनेता पालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 08:52 PM2019-07-12T20:52:36+5:302019-07-12T20:54:57+5:30

आमदार प्रताप सरनाईक व विरोधी पक्षनेते प्रविण पाटील लिफ्टमध्ये अडकल्याने एकच तारांबळ उडाली.

The MLA, the Opposition Leader, got stuck in the municipal corporation's lift | आमदार, विरोधी पक्षनेता पालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले

आमदार, विरोधी पक्षनेता पालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले

ठळक मुद्दे मीरारोडच्या कनकिया भागातील जांगीड कॉम्पलेक्समध्ये महापालिकेचे स्व. विलासराव देशमुख भवन ही इमारत आहे.आमदार अडकल्याने उपस्थित शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकच तारांबळ उडाली.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग समिती ४ च्या नवनिर्वाचीत सभापती तारा घरत यांच्या प्रभाग समिती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले आमदार प्रताप सरनाईक व विरोधी पक्षनेते प्रविण पाटील लिफ्टमध्ये अडकल्याने एकच तारांबळ उडाली.

मीरारोडच्या कनकिया भागातील जांगीड कॉम्पलेक्समध्ये महापालिकेचे स्व. विलासराव देशमुख भवन ही इमारत आहे. सदर इमारती मध्ये पालिकेचे कर विभागाचे कार्यालय असुन तीसराया मजल्यावर प्रभाग समिती सभापती यांचे कार्यालय आहे. पालिकेत भाजपाने शिवसेनेशी युती केल्या नंतर प्रभाग समिती ४ च्या सभापती पदी शिवसेनेच्या तारा घरत यांची निवड झाली. घरत यांच्या पालिका कार्यालयातील सभापती दालनाचे उद्घाटन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ठेवले होते. आ. सरनाईक हे उद्घाटनासाठी आले असता त्यांना घेऊन प्रविण पाटील हे लिफ्टने तीसराया मजल्यावर जाण्यास निघाले. परंतु लिफ्ट थोडी वर जात नाही तोच तळ आणि पहिल्या मजल्याच्यामध्येच थांबली.

आमदार अडकल्याने उपस्थित शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकच तारांबळ उडाली. युवासेनेचे पवन घरत यांनी लिफ्टचे वरुन काहीसे निसटलेले दार लॉकमध्ये अडकवल्यानंतर लिफ्ट सुरु झाली. या आधी देखील सदरची लिफ्ट सातत्याने मध्येच बंद पडत असल्याच्या तक्रारी असूनही पालिका प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्या बद्दल शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: The MLA, the Opposition Leader, got stuck in the municipal corporation's lift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.