‘मिस वसई’ हरिता टॉलिवूडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 06:02 AM2018-11-17T06:02:07+5:302018-11-17T06:03:04+5:30

चेम्मरीआडूमधून पदार्पण : कला क्रीडा महोत्सवातून केली सुरुवात

In 'Miss Vasai' Harita Tollywood | ‘मिस वसई’ हरिता टॉलिवूडमध्ये

‘मिस वसई’ हरिता टॉलिवूडमध्ये

Next

वसई : वसई तालूका कला क्रीडा महोत्सवातून २०१६ साली ‘मिस वसई’ किताब मिळवणारी हरिता नायर हिने तमीळ चित्रपटसुष्टीत पदार्पण केले आहे. २२ वर्षीय हरिता लवकरच चेम्मरीआडू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वसईच्या होली फॅमिली शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर हिंदूजा महाविद्यालयातून अकाऊंट अ‍ॅण्ड फायनान्सचे शिक्षण तीने पूर्ण केले आहे.

वसई तालूका कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून २०१६ साली मिस पर्सनॅलिटी स्पर्धेत हरिताने सर्वप्रथम सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तीने मिस वसई हा किताब मिळवला. त्यानंतर तिने पाठी वळून बघीतले नाही. अभिनेत्री बनायचे हे स्वप्न उराशी बांधून तिची धडपड सतत सुरू होती. त्याला तिच्या आई वडीलांचेही पाठबळ मिळत होते. याच दरम्यान तीने मिस चेन्नई व मिस केरळा या स्पर्धेतही सहभाग नोंदविला होता.

राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तीला प्रथम तमीळ दिग्दर्शक प्रतिश सुब्रमण्यम यांनी चेम्मरीआडू या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी विचारले. हरिताची मिस इंडिया स्पर्धेसाठी तयारी सुरू असल्याचे समजले असून मराठी चित्रपटसुष्टीतही तिला काम करण्याची इच्छा आहे.

हरिताची जिद्द व चिकाटी पाहून आंम्ही तिला पाठींबा दिला.आज ती,तीने निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होत आहे याचा आंम्हाला आनंद आहे.
- हरिदास नायर,
हरिताचे वडील
 

Web Title: In 'Miss Vasai' Harita Tollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.