पालघरमध्ये ​​​​​​​प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 03:07 PM2018-06-28T15:07:36+5:302018-06-28T15:08:07+5:30

डहाणू तालुक्यातील वाणगाव पूर्वेकडील जंगल भागात मोठ्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरूण -तरूणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

love couple suicide in Palghar | पालघरमध्ये ​​​​​​​प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

पालघरमध्ये ​​​​​​​प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Next

पालघर :  डहाणू तालुक्यातील वाणगाव पूर्वेकडील जंगल भागात मोठ्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरूण -तरूणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हनुमान नगर येथील जितेश डावरे हा मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या मित्राची बाईक घेवून घरातून निघाला होता. जितेश हा विवाहित असून बोईसर गणेशनगर येथील आम्रपाली गवई या विवाहित मुलीसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते.मुलीच्या घरच्यांना जितेशसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती असल्याने आम्रपालीच्या घरचे हे जितेशच्या घरी काल रात्री समज  देण्यासाठी गेले होते. मात्र, गुरुवारी सकाळी गावकऱ्यांना दोघांचे मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळले. 

तारापुर औद्योगिक वसाहतीत एक कंपनीत जितेश डावरे हा सुमारे ६ वर्षांपासून काम करत होता. २० दिवसापूर्वी आम्रपाली गवई ही देखील त्याच कंपनीत कामाला लागली होती. ओळखीतून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघे देखील विवाहित असून विवाहबाह्य संबंध या मुलीच्या घरच्यांना माहिती झाले होते, अशी खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मंगळवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या दोघांना त्यांचे घरचे शोधत होते. मात्र, आज वाणगाव पुर्वेकडील जंगल परिसरात मोठ्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत जितेश आणि आम्रपालीचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी जितेश याने मित्राची आणलेली बाईक दुरवर एक स्टँडवर उभी केली होती. त्या बाईकवर मयत मुलीची चप्पल देखील आढळून आली. वाणगाव पोलीस ठाण्यात याबाबत आत्महत्येचा गुन्हा दाखल आहे. घटनास्थळी पोलिसांना आढळून आलेली बाईक, मयत मुलीची चप्पल, आत्महत्येसाठी वापरलेला दोरखंड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

 

Web Title: love couple suicide in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.