लोकसभा निवडणूक: बविआ कुणाला संधी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:02 PM2019-03-14T23:02:43+5:302019-03-14T23:02:55+5:30

शिवसेना-भाजपातील अंतर्गत नाराजी पथ्यावर

Lok Sabha election: Who will give opportunity to BWI? | लोकसभा निवडणूक: बविआ कुणाला संधी देणार?

लोकसभा निवडणूक: बविआ कुणाला संधी देणार?

Next

वसई : बविआचे पालघर जिल्ह्यात तीन आमदार आहेत. वर्ष २००९ मध्ये खासदार बळीराम जाधव पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. या मतदारसंघात बविआचे स्थान महत्त्वाचे असले तरी २०१४ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये जाधव यांचा अ‍ॅड.चिंतामण वनगा यांनी पराभव केला होता. खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पालघर लोकसभेची पोटनिवडणूक घेतली गेली. त्यावेळी बविआ ने पुन्हा जाधव यांनी संधी दिली. त्यावेळी जाधव यांच्या व्यतिरिक्त ही निवडणूक लढवावी अशी मागणी राजेश पाटील, चंद्रकांत खुताडे, परशुराम चावरे, दिनकर वाढण व विष्णू कडव यांनी व्यक्त केली होती.

भाजपानेही दिवंगत खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना डावलून कॉग्रेसमधून राजेंद्र गावित यांना आयात करून उमेदवारी जाहिर केली होती. त्यामूळे वनगा कुटूंबियांचे नाराज समर्थक श्रीनिवास वनगा यांना मातोश्रीवर घेऊन गेले. एकेकाळी मित्र पक्ष असलेल्या सेनेने भाजपाविरोधात निवडणूकीच्या रिंगणात उतरत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी जाहिर केली. भावनीक आवाहन करत मतदारांना श्रीनिवास वनगा यांना निवडून द्यावे यासाठी खुद्द पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी वसई सह पालघर जिल्हात सभा घेतल्या.
डिवचलेल्या भाजपा सरकारनेही साम, दाम, दंड व भेद याचा वापर करायला सुरूवात केली. खूद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपा-यातील गाला नगर येथे जाहिर सभा घेत सेनेसह बविआ पक्षावर व अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यावर खालच्या पातळीवर घसरत टिका केली होती. त्यानंतर आमदार ठाकूर यांनीही फडणवीस यांना चोख उत्तर दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ गावांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी गावे वगळण्याबाबत शपथपत्र सादर करतो असे जाहिर करत मतदारांना गाजराचे आमीष दाखिवले होते.
पालघरची लढाई जिंकणारच हा विडा उचललेल्या भाजपाने दोन मुख्यमंत्री, एक केंद्रीय मंत्री व अर्धा डझन आमदारांची फौज पालघरमध्ये पाठवली होती.

मात्र. या निवडणूकीचा धुराळा उडालेला असताना बविआने काही अंशी नमते घेतलेले दिसत होते. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन-चार मोजक्या सभा घेऊन त्यांनी आपल्या परंपरागत मतदार राजाला आवाहन केले. मात्र त्याचा फारसा फायदा मात्र झाला नाही. या निवडणूकीत थेट लढत भाजपा-बविआ पक्षात होणार अशी राजकीय गणित करणाऱ्यांना प्रत्यक्ष निवडणूक निकालाच्या दिवशी धक्का बसला. तिसऱ्या क्र मांकावर गुहीत धरलेल्या शिवसेना पक्षाने मुसंडी मारत दुसरे स्थान पटकावत बविआला तिसºया स्थानावर ढकलले होते. भाजपाने ही निवडणूक जिंकत काँग्रेसमधून आयात केलेला उमेदवार राजेंद्र गावित यांना खासदार बनवत दिल्ली दरबारी बसवले
होते.

पालघर लोकसभा निवडणूक पुन्हा गाजणार!
आगामी काळात पालघर लोकसभा निवडणूक पून्हा गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपा-सेना युतीनंतर शिवसेनेसाठी पालघर लोकसभेची जागा सोडली असल्याचे सांगण्यात आले असले तरी अजून याबाबत शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र, जर शिवसेना ही जागा लढवत असेल तर निश्चितच त्यांचा उमेदवार श्रीनिवास वनगा हेच असतील असा अंदाज बांधला जात आहे.
बहूजन विकास आघाडी पक्षही या निवडणूकीत पून्हा नशीब अजमावून पाहत असून गेल्या दोन निवडणूकीत माजी खासदार बळीराम जाधव यांना मतदार राजाने नाकारल्यानंतर पक्षश्रेष्ठी पुन्हा जाधव यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करतील की, नाही ते येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
 

Web Title: Lok Sabha election: Who will give opportunity to BWI?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.