वर्षभरात चार हजार सापांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:08 AM2019-07-16T01:08:58+5:302019-07-16T01:09:04+5:30

पालघर जिल्ह्याला पश्चिम घाटाचे कोंदण लाभल्याने विपुल वन संपदा आहे.

Lives of four thousand snakes in a year | वर्षभरात चार हजार सापांना जीवदान

वर्षभरात चार हजार सापांना जीवदान

Next

- अनिरुद्ध पाटील 
डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्याला पश्चिम घाटाचे कोंदण लाभल्याने विपुल वन संपदा आहे. त्यामुळे अन्य वन जीवांसह सापांचे प्रमाण अधिक आहे. यात बिन विषारी, निम विषारी तसेच विषारी सापांचा समावेश आहे. शेतकऱ्यांचा मित्र असे जरी संबोधले जात असले, तरी लोकांमध्ये असणारी भीती, अंधश्रद्धा आणि गैरसमजुतीमुळे नाहक बळी जातो. यामुळेच सापांना मारू नये, यासाठी सातत्याने वनविभाग तसेच सर्पमित्रांकडून जनजागृती करण्यात आली. घर आणि भोवतालच्या परिसरात साप दिसल्यावर त्यांना मारण्यापेक्षा सर्पमित्रांची मदत घ्यावी असे आवाहन वन विभाग आणि वाईल्डलाइफ कन्झर्व्हेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेयर असोसिएशन या प्राणिमित्र संस्थेकडून करण्यात येते. यामुळेच गेल्या वर्षी डहाणू तालुक्यातून सुमारे चारहजार सापांना वाचिवण्यात यश आले आहे.
भौगोलिक संपदेमुळे तालुक्यातील जंगलात विविध जातीचे साप मोठ्या प्रमाणात आढळतात. तर डोंगराच्या पायथ्याशी शेती आणि वस्त्या असल्याने साप घरात शिरल्याच्या घटना नेहमीच घडतात. त्यामुळे कवड्या सर्प, तस्कर, डूरक्या घोणस, धामण, रुखय, पाणदिवड, नानेटी, मांडूळ, अजगर हे बिनविषारी सर्प, तर हरणटोळ आणि मांजºया हे निम विषारी साप तर नाग, फुरसे, मण्यार, घोणस या विषारी सापांच्या जाती येथे दिसतात. काही वर्षांपासून तालुक्यातील भात क्षेत्र घटल्याने तेथे झाडेझुडुपे वाढली आणि मानवी वस्तीत सापांचा शिरकाव वाढला.
दरम्यान, या तालुक्यातील सर्पमित्रांनी एकत्र येऊन धवल कंसारा यांच्या पुढाकाराने वाईल्डलाइफ कन्झर्वेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या नोंदणीकृत वन्यजीव संस्थेची स्थापना केली. पहिल्या टप्प्यात घरात साप दिसल्याची माहिती मिळाल्यावर सर्पमित्र जाऊन त्याला पकडायचे. त्यांना वन विभागाचे मार्गदर्शन तसेच मदत मिळाल्याने या कामाला गती आली असून तालुक्यातील विविध गावातून अनेक सदस्य या संस्थेशी जोडले आहेत. या संस्थेने विविध शाळा, संस्था तसेच पाड्यापाड्यावर जाऊन लोकांमध्ये सापांविषयीची जनजागृती मोहीम राबवली. सापांच्या विविध जातींची नावे, त्यांचे प्रकार आणि विषारी, निम विषारी, बिनविषारी साप ओळखण्यासाठी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, प्रोजेक्टर, भित्तिपत्रके आदींच्या माध्यमातून साप दिसल्यास वन विभाग आणि या संस्थेला कळविण्याचे आवाहन केले. सोशलमीडियाच्या माध्यमातून सर्पमित्रांचे संपर्क क्र मांक गावोगावी पोहचिवण्यात मदत झाली. या नोंदी संस्थेकडून केल्या जात असून सापाचा प्रकार, संपर्क साधणाऱ्यांचा पत्ता घटनास्थळी जाणाºया सर्पमित्राचे नाव या माहितीचा समावेश असल्याचे डब्ल्यूसीएडब्ल्यूए या संस्थेचा सदस्य रेमंड डिसोझा यांनी माहिती दिली.
>वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेकडून डहाणू तालुक्यातील घर, परिसरातून सर्पमित्र रेमंड डिसोझा, सागर पटेल आणि विशाल राऊत यांनी पकडून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अधिवासात सोडलेले सर्प.
>काळीजादू आणि धनप्राप्तीकरिता मांडूळ या जातीच्या सापाच्या तस्करीचा गुन्हा मनोर पोलीस ठाण्यात नोंदवला गेला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर डहाणू वन परिक्षेत्र अधिकारी राहुल मराठे यांना त्या दोन्ही मांडूळ सापांना अधिवासात सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार या सापांची सुटका झाली.
- राहुल मराठे, डहाणू
वन परिक्षेत्र अधिकारी
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये, सापाला पकडणे, जवळ बाळगणे आणि इजा पोहचवणे हा गुन्हा आहे. घरात वा वस्तीत साप आढळल्यास वन विभाग आणि डब्ल्यूसीएडब्ल्यूए या संस्थेशी संपर्क साधा.’’
- धवल कंसारा (मानद वन्यजीव रक्षक पालघर जिल्हा/ डब्ल्यूसीएडब्ल्यूए संस्थापक)

Web Title: Lives of four thousand snakes in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.