जमिनीची भरपाई २० वर्षे नाही, शेतकरी आले मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:46 AM2017-12-30T02:46:33+5:302017-12-30T02:46:41+5:30

विक्रमगड : तालुक्यातील मौजे कवडास, तलवाडा व खडकी आदी गावातील २२ शेतक-यांच्या उपजिवीकेचे एकमेव साधन असलेल्या मालकी शेतजमिनीतून सन-१९९४ सालापासून पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीची जवळ जवळ ४०० के़ व्ही.ची गांधार-पडघे ट्रान्समिशन टॉवर लाईन गेलेली आहे़

The land compensation did not last for 20 years, the farmer came | जमिनीची भरपाई २० वर्षे नाही, शेतकरी आले मेटाकुटीला

जमिनीची भरपाई २० वर्षे नाही, शेतकरी आले मेटाकुटीला

Next

राहुल वाडेकर 
विक्रमगड : तालुक्यातील मौजे कवडास, तलवाडा व खडकी आदी गावातील २२ शेतक-यांच्या उपजिवीकेचे एकमेव साधन असलेल्या मालकी शेतजमिनीतून सन-१९९४ सालापासून पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीची जवळ जवळ ४०० के़ व्ही.ची गांधार-पडघे ट्रान्समिशन टॉवर लाईन गेलेली आहे़ व त्यावेळेस या टॉवरखाली जात असेल्या जमीन मालकांच्या जमीनीचे सपाटीकरण करुन ती संपादित करुन त्यावरील झाडे व इतर पिके जमीनदोस्त केली गेली व नोटीस बजावून नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले होते त्याला २० वर्षाहून अधिक काळ लोटला तरी जमिनीची भरपाई मिळालेली नाही.
याकरीता शेतक-यांनी अनेकवेळा कंपनीच्या कार्यालयात भरपाई मिळविण्यासाठी खेट्या घातल्या .
मात्र त्यांना अदयापही एक छदामाचीही भरपाई मिळालेली नाही़ यामुळे शेतकरी मेटामुटीला आलेला आहे. अखेर सर्व शेतकरी एकत्र मिळुन आता त्यांनी दाद मागण्याकरीता जिल्हाधिकारी पालघर यांचेकडे निवेदन दिलेले आहे़ आता तरी ही भरपाई मिळेल अशा आशेवर हे शेतकरी आहेत.
दरम्यान याबात येथील शेतकºयांची संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, त्यावेळेस टॉवर लाईन टाकण्याकरीता आमच्या जमीनीत असलेली झाडे, झाडोरा, कलमे, पिके, जमीनदोस्त करुन जमीन संपादीत करण्यात आली व त्याप्रमाणे कंपनीकडून पंचनामा देखील केलेला आहे़
आम्ही आमच्या जमिनीची भरपाई मिळावी यासाठी १९९४ पासून आमचे झालेले जमीनीचे नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी कंपनीच्या कार्यालयात बोईसर , महागाव, कल्याण, वापी अशा ठिकाणच्या शेतक-यांच्या वतीने चंद्रकांत गोविंद घाटाळ, ़सिताराम सखाराम चव्हाण,अनंता देवु भोईर, काश्या कमळया घाटाळ यांनी दाद मागितली आहे. परंतु अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. ती तातडीने न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.
>अनेक मान्यवरांना दिले निवेदन
संपादित केलेली जमीन ही आमची रोजीरोटी असल्याने व तिची भरपाई न देऊन आमची या कंपनीने फसवणूक केली आहे ़ आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करुन देखील कंपनी आमची दखल घेत नाही व थातूरमातूर उत्तरे देऊन आमची बोळावण केली जाते. आम्हांस आता तरी न्याय दयावा व आम्हांस भरपाई मिळावी याकरीता आम्ही एकत्रितरित्या जिल्हाधिका-यांना विनंती अर्ज सादर केला आहे़ व त्याच्या प्रति कारवाईसाठी पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडियाचे व्यवस्थापक व उप विभागीय अधिकारी वाडा, ़तहसिलदार विक्रमगड, तालुका पत्रकार संघ, यांना सादर केला आहे़

Web Title: The land compensation did not last for 20 years, the farmer came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.