ज्ञानाच्या सामर्थ्यावर मोठे होता येते -डॉ. अरूणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:35 PM2018-02-23T23:35:02+5:302018-02-23T23:35:02+5:30

जगात जात-पात वा धर्माच्या नावावर नव्हे तर ज्ञानाच्या निकषावर मोठे होता येते. त्यासाठी विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे

Knowledge can be bigger - Dao Aruna Dhere | ज्ञानाच्या सामर्थ्यावर मोठे होता येते -डॉ. अरूणा ढेरे

ज्ञानाच्या सामर्थ्यावर मोठे होता येते -डॉ. अरूणा ढेरे

googlenewsNext

वसई : जगात जात-पात वा धर्माच्या नावावर नव्हे तर ज्ञानाच्या निकषावर मोठे होता येते. त्यासाठी विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. पुस्तके-ग्रंथ वाचनातून भावनिक व वैचारिक समृद्धी प्राप्त होऊन जीवनाला नवा दृष्टीकोन मिळतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी वसईत बोलताना केले.
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन डॉ. ढेरे यांच्या हस्ते झाले. संहार ते सर्जन आणि जन्म ते मृत्यू पर्यंतच्या प्रवासात ग्रंथ आपल्यावर अनुकुल प्रभाव टाकत असतात. त्यांचे सोबती व्हा. ग्रंथातून वर्तमानाचे भान येते. भविष्याचा वेध घेण्याची समज मिळते, असे डॉ. ढेरे यांनी पुढे बोलताना सांगितले. वाचनाने आपले आयुष्य कसे समृद्ध केले याविषयी बोलताना आ़नंद देणाºया तसेच अस्वस्थ करणाºया अनेक श्रेष्ठ ग्रंथांच्या आठवणी त्यांनी यावेळी जागवल्या. प्राचार्य डॉ. केशव घोरुडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शत्रुघ्न फड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

Web Title: Knowledge can be bigger - Dao Aruna Dhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.