टाईमपाससाठी अपहरणाचा बनाव, पोलिसांकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 04:47 AM2019-01-09T04:47:59+5:302019-01-09T04:48:44+5:30

पोलिस पोहचले घरी : टाईमपास करणाऱ्या तरुणावर १७२ अंतर्गत गुन्हा दाखल

The kidnapping had to be made in the expensive | टाईमपाससाठी अपहरणाचा बनाव, पोलिसांकडून गुन्हा दाखल

टाईमपाससाठी अपहरणाचा बनाव, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Next

वसई : पोलीस हे जनतेच्या सेवेकरता असतात याचे भान सर्वानीच ठेवले पाहिजे. मात्र टाईमपास म्हणून पोलिसांना अपरात्री फोन करून स्वत:चे अपहरण झाल्याचा फोन करणाºयावर पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवून त्याला अटक केली आहे. स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून पोलिसांना कामाला लावणाºया या तरु णाचे नाव शिवकुमार गौतम (३६) असे आहे. त्याने ३ जानेवारीला रात्री ९.१५ च्या सुमारास त्याच्या मोबाईलवरु न सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जाधव यांना फोन लावून आपले तुंगारेश्वर फाटा येथून आपले अपहरण झाल्याची माहिती दिली होती.

फोनवर बोलताना त्याने खुप घाबरला असल्याचा अभिनयही केला. आपले अपहरण केले असून ते लोक अज्ञात स्थळी घेऊन जात आहेत असे त्याने सांगितले. त्याने त्याच्या मोबाईलवरु न हा फोन केल्यानंतर लगेचच फोन स्विचआॅफ झाला होता.
तातडीने चार सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलचा फौजफाटा तृंगारेश्वर फाटा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी शोध मोहिम सुरु केली पण शिवकुमार गौतमचा काही पत्ता लागला नाही.

पोलिसांनी स्विच आॅफ झालेल्या गौतमच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. दुकानदार आणि स्थानिकांची चौकशी केली पण त्यातून गौतमच्या बेपत्ता होण्याबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी गौतमच्या घरचा पत्ता शोधून त्याच्या कुटुंबियांशी बोलण्याचा निर्णय घेतला. चार जानेवारीला पहाटेच्या सुमारास जेव्हा पोलीस पथक वसई फाटा येथील गौतमच्या घरी पोहोचले तेव्हा समोर गौतमला पाहून त्यांना धक्का बसला. गौतम आरामात झोपला होता. पोलिसांना दरवाजात पाहून गौतमला धक्का बसला. आपण गंमत म्हणून फोन केला होता. माझा फोन कॉल गांभीर्याने घ्याल असे वाटले नव्हते असे त्यांना पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चुकीची माहिती दिल्या प्रकरणी कलम १७२ अंतर्गत गौतमला अटक केली.
 

Web Title: The kidnapping had to be made in the expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.