महापौर मॅरेथॉनमध्ये करणसिंग, प्राजक्ता विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:12 PM2018-12-09T23:12:46+5:302018-12-09T23:13:01+5:30

अठरा हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग, चंदेरी ताऱ्यांमुळे वाढला धावपटूंचाही उत्साह

Karan Singh, Prajakta winners in the Mayor Marathon | महापौर मॅरेथॉनमध्ये करणसिंग, प्राजक्ता विजेते

महापौर मॅरेथॉनमध्ये करणसिंग, प्राजक्ता विजेते

Next

वसई : आर्मीच्या करणसिंगने वसई विरार महापौर मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. गतवर्षीही तोच पहिला आला होता. एकवीस किलोमीटरच्या अर्धमॅरेथान स्पर्धेत पुरूष व महिलांमध्ये अनुक्र मे शंकर मन थापा व प्राजक्ता गोडबोले यांनी बाजी मारली.

पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्र मे प्रथम क्र मांक दोन लाख पन्नास हजार रूपये, द्वितीय एक लाख पंचवीस हजार रूपये तर तृतीय पंच्चाहात्तर हजार रूपयांची बक्षिसे देण्यात आली. अर्धं मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्र मे प्रथम क्र मांक एक लाख पंचवीस हजार रूपये, द्वितीय पंचाहत्तर हजार रूपये तर तृतीय साठ हजार रूपयांची पारितोषिक देण्यात आली.

यावेळी महापौर रूपेश जाधव, ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर भारताची आघाडीची धावपटू दुती चंद, अ‍ॅथलेटीक्स स्नेहल राजपूत, आमदार हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर, उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, माजी महापौर राजीव पाटील, प्रविणा ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, प्रांताधिकारी दिपक क्षीरसागर, सिग्मा टिटिकेचे शशांक चाफेकर, मुंबई युनिव्हर्सिटीचे उपकुलसचीव दिनेश कांबळे, एशियन मॅरेथॉन चॅम्पियन सुनिता गोधरा, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी, नगरसेवक पंकज ठाकूर, हार्दीक राऊत, वसईचे तहसिलदार किरण सुरवसे, नगरसेवक प्रशांत राऊत, नगरसेवक अजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा रसिकांनीही यास्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मॅरेथॉनचे गटनिहाय विजेते
४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन
१) करण सिंग २ तास २२ मिनीटे १७ सेकंद,
२) लाल जी यादव २ तास २२ मिनीटे ५८ सेकंद,
३) शामरू यादव २ तास २३ मिनीटे ४ सेकंद,
४) आशिष कुमार २ तास २३ मिनीटे ३५ सेकंद,
५ ) संजीत लुवांग २ तास २५ मिनीटे ७ सेकंद

अर्धं मॅरेथॉन पुरूष
१) शंकर मन थापा १ तास ५ मिनीटे ४८ सेकंद,
२ ) दुर्गा बुद्धा १ तास ६ मिनीटे ४ सेकंद,
३) गोविंद सिंग १ तास ६ मिनीटे ४८ सेकंद,
४ ) ए बी बेलीअप्पा १ तास ७ मिनीटे १३ सेकंद
५) राहुल कुमार पाल १ तास ७ मिनीटे १४ सेकंद.

अर्धं मॅरेथॉन महिला
१) प्राजक्ता गोडबोले १ तास 18 मिनीटे ५६ सेकंद,
२) मंजू यादव १ तास १९ मिनीटे ३० सेकंद,
३) आरती पाटील १ तास १९ मिनीटे ५० सेकंद,
४) किरण सहदेव १ तास २१ मिनीटे ९ सेकंद
५) जनाबाई हिरवे १ तास २१ मिनीटे 49 सेकंद

मराठी सेलिब्रेटींची उपस्थिती
स्वप्निल जोशी,मुक्ता बर्वे,प्रदीप पटवर्धन , समीर चौगुले, मनोज जोशी, जयवंत वाडकर , विजय पाटकर तसेच सुदेश बेरी यांनी उपस्थित राहून मॅरेथॉन स्पर्धकांचा उत्साह वाढविला. त्यामुळे स्पर्धेला एक वेगळीच रंगत प्राप्त झाली होती.

Web Title: Karan Singh, Prajakta winners in the Mayor Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.