खासदार कपिल पाटील यांचा वाड्यात दौरा; कार्यकर्त्यांनी घातले साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:27 AM2018-06-07T01:27:34+5:302018-06-07T01:27:34+5:30

खासदार कपिल पाटील यांनी वाडा तालुक्यातील भिवंडी ग्रामीण लोकसभा क्षेत्रात येणा-या गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करून सबंधित अधिका-यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून तातडीने पाठपुरावा करण्याच्या सुचना भाजपा तालुका अध्यक्षांना केल्याने नागरिकांनी समाथान व्यक्त केले.

 Kapil Patil's visit to the castle; The activists laid the foundation | खासदार कपिल पाटील यांचा वाड्यात दौरा; कार्यकर्त्यांनी घातले साकडे

खासदार कपिल पाटील यांचा वाड्यात दौरा; कार्यकर्त्यांनी घातले साकडे

Next

वाडा: खासदार कपिल पाटील यांनी वाडा तालुक्यातील भिवंडी ग्रामीण लोकसभा क्षेत्रात येणा-या गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करून सबंधित अधिका-यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून तातडीने पाठपुरावा करण्याच्या सुचना भाजपा तालुका अध्यक्षांना केल्याने नागरिकांनी समाथान व्यक्त केले.
यावेळी त्यांनी निंबवली, केळठण, चांबले, घोणसई, मेट,मुसारणे, चिंचघर, डोंगस्ते, सापरोंडे, मांगाठणे, कोंढले अशा विविध गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्याना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्याच्या सोबत भाजपा चे जेष्ठ नेते बाबाजी काठोले, विभागीय चिटणीस योगेश पाटील, जि.प.पालघर महीला व बालकल्याण सभापती धनश्री चैधरी, तालुका अध्यक्ष संदीप पवार, तालुका सरचिटणीस मंगेश पाटील, युवा विभागिय चिटणीस
दिनेश पाटील, प.स.उपसभापती जगन्नाथ पाटील, भगवान चैधरी, दशरथ पटील कुंदन पाटील, अंकिता दुबेले,मोहन पवार, गणेश पाटील, चिंचघर सरपंच, संकेत नांगरे उपसरपंच नामदेव भोईर आदी उपस्थित होते.

- कुडूस चिंचघर- गैरापूर रस्त्याचे निकृष्ट काम, कुडूस येथे पोलीस ठाणे, वाडा रूग्णालयासाठी शववाहीनी, प्राथमिक आरोग्यकेंद्रातील अपु-या सुविधा, अग्नीशमन दल, अंतर्गत रस्ते, चिंचघर येथील ११६ वर्षापूर्वीच्या जुन्या इमारतीची दुरावस्था अशा समस्या सोडविण्याची विनंती केली.

Web Title:  Kapil Patil's visit to the castle; The activists laid the foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.