नियमांना बगल देत आयटीआयची परीक्षा; विक्रमगडमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:20 AM2019-02-16T00:20:07+5:302019-02-16T00:20:41+5:30

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे स्वयंरोजगार आणि उद्योगशिल युवापिढी उभी राहत असलली तरी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणाऱ्या आय.आय.टी.मध्ये नियमांना बगल देण्यात आली आहे.

 ITI examination beside rules; Types of Vikramgad | नियमांना बगल देत आयटीआयची परीक्षा; विक्रमगडमधील प्रकार

नियमांना बगल देत आयटीआयची परीक्षा; विक्रमगडमधील प्रकार

Next

- अजय महाडिक

ठाणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे स्वयंरोजगार आणि उद्योगशिल युवापिढी उभी राहत असलली तरी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणाऱ्या आय.आय.टी.मध्ये नियमांना बगल देण्यात आली आहे. २०१७ ते २०१९ या बॅचमधील काही परिक्षार्थींची हजेरी नियमानुसार पुर्ण नसतानाही त्यांना परीक्षेचा बसू दिले जात असल्याने व्यवसाय शिक्षण व प्रादेशिक संचलनालय मुंबई येथे तक्रार करण्यात आली आहे.
या संस्थेतील गट निर्देशक एस. आर. घुगे व प्रभारी प्राचार्य परदेशी यांनी संगनमताने प्रशिक्षणार्थ्यांना हजेरी व प्रशिक्षणाची सुट देत परीक्षेला बसविल्याचा आरोप संतोष जाधव यांनी केला आहे. आॅगस्ट २०१७ ते जुलै २०१८ या आय.टी.आय.च्या वेल्डर बॅचचे कुणाल जयराम मुरोडे व भुषण मुरलीधर भोई या दोघांचे हजेरीचे प्रमाण ५० ते ५५ टक्केपेक्षा कमी असल्याने त्यांना जुलै-२०१८ मध्ये झालेल्या सेकंड सेमिस्टरच्या परीक्षेला बसता आले नव्हते. दरम्यान, घुगे व परदेशी यांनी वरील प्रशिक्षणार्थ्यांना जानेवारी २०१९ च्या परीक्षेला बसण्याची अनुमती देऊन नियमावली पायदळी तुडवली आहे.
प्रशिक्षणार्थ्यांच्या गैरहजेरीमुळे प्रशिक्षण अपुर्ण राहिल्यास योग्य त्या कारणासहीत तसा प्रस्ताव सहसंचालकांना सादर करुन त्याच्या परवानगीने प्रशिक्षणार्थ्यांची हजेरी व प्रशिक्षण पुर्ण झाल्याची खात्री करुनच त्यांना परीक्षेला पुन्हा बसवगी दिली जाते. मात्र, वरील दोन्ही प्रशिक्षणार्थी आय.टी.आय.मध्ये सदर काळात गैरहजर राहिल्याचे कागदोपत्री स्पष्ट असताना त्यांना जानेवारी-२०१९ च्या परीक्षेसाठी पात्र ठरविल्याने नियमित असणाºया अन्य विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले. यासंदर्भात प्रधानसचिव, कौशल्य विकास उद्योजकता विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.

वरिष्ठ कार्यालयाचीही केली दिशाभूल?
संधाता (वेल्डर) विभागातील या दोन्ही विद्यार्थ्यांबाबत जून २०१८ मध्ये डी. वाय. गवस या अध्यापकाने सततच्या गैरहजेरी बाबत चार रिपोर्ट दिले आहेत. त्यांची हजेरी ८० टक्के पेक्षा कमी असून त्यांना वारंवार सूचना देऊन ही गैरहजेरी कायम असल्याने त्यांना परीक्षेला बसू दिले जाऊ नये असे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणामध्ये गटनिर्देशक एस.आर. घुगे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांची आॅगस्ट २०१८ मध्ये प्रशिक्षण व हजेरी पुणे केल्याची माहिती दिली आहे. मात्र, ८०% हजेरी व प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी किमान तीन महिन्याचा अवधी लागतो. त्यातच शिल्प निर्देशक डी. वाय. गवस यांना २७ जुलै २०१९ ला बदलीचे आदेश आले असून ते ३१ जुलै नंतर कुर्ला नेहरुनगर येथील आयटीआयमध्ये रुजू झाल्याने घुगे यांचा दावा निराधार ठरतो.

सदर विद्यार्थ्यांचे आॅगस्ट २०१८ मध्ये प्रशिक्षण व हजेरी पुर्ण के ली असून तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. त्या आधारेच ते परीक्षेला बसले असल्यामुळे आरोप निराधार आहेत.
- एस.आर. घुगे, गटनिर्देशक आय.टी.आय. विक्रमगड

Web Title:  ITI examination beside rules; Types of Vikramgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.