इंटर सिटी एक्स्प्रेसमध्ये युवतीला महिला प्रवाशाची मारहाण, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 4:39am

बुधवारी सकाळी विरारहून इंटर सिटी एक्स्प्रेसने बोईसर येथे कॉलेजला निघालेल्या कॉलेज युवती आणि तिच्या आईला महिला डब्यात जागेवर बसण्यावरून मारहाण करण्यात आली.

वसई : बुधवारी सकाळी विरारहून इंटर सिटी एक्स्प्रेसने बोईसर येथे कॉलेजला निघालेल्या कॉलेज युवती आणि तिच्या आईला महिला डब्यात जागेवर बसण्यावरून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बोईसर येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणारी सपना मिश्रा आई रिटासोबत विरारहून सकाळी ७.५८ला सुटणाºया इंटर सिटी एक्स्प्रेसमधून महिलांच्या डब्यातून निघाली होती. सपना जागा मिळाल्याने बसली होती. मात्र, तिच्यानंतर आलेल्या एका महिला प्रवाशाने तिला जागेवरून उठण्यास सांगितले. सपनाने नकार दिला असता त्या महिलेने शिवीगाळ करीत सपनाच्या थोबाडीत लगावली. सपनाची आई यात मध्ये पडल्या असता संतापलेल्या महिलेने दोघींनाही मारहाण केली. यात त्या महिलेच्या साथीदारांनीही तिला साथ दिली. बुधवारी संध्याकाळी सपनाने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या डब्यात महिलांचा एक गट नेहमीच जागा अडवून इतर महिला प्रवाशांना त्रास देतो, अशी डब्यातील इतर महिलांची तक्रार असल्याचे सपनाने सांगितले. हा गट दादागिरी, शिवीगाळ आणि प्रसंगी हात उचलत असल्याने त्यांच्याविरोधात कुणीही बोलत नाही. पण, मला आणि आईला मारहाण करून जागेवरून उठण्यास भाग पाडले. त्यामुळे आम्ही विरारहून बोईसरपर्यंत उभ्याने प्रवास केल्याचे सपनाने सांगितले.

संबंधित

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार पुन्हा देणार नोकरी
विना तिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ
रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबातच्या पाठपुराव्याची पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल
रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
हावडा मेलचे तीन डबे इगतपुरीजवळ घसरले

वसई विरार कडून आणखी

पन्नास हजार बियांच्या रोपणाचा अनोखा प्रयोग
वसईकरांना मिळणार अधिक दर्जेदार वीज पुरवठा
'त्या' स्कूल बसला एक टायरच नव्हता, नशीब बलवत्तर म्हणून मुलं वाचली!
डहाणूकडे जाणाऱ्या लोकलवर झाड कोसळले
जमिनीच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी

आणखी वाचा