गोविंदा पथकांना महापालिका देणार विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 02:16 AM2018-08-15T02:16:56+5:302018-08-15T02:17:22+5:30

दरवर्षी होणाऱ्या दहिहंडी उत्सवात अनेक जणांचे अपघात होतात. त्यात अनेक जणांना गंभीर दुखापत होते तर काही जणांना जीव देखील गमवावा लागतो.

Insurance policy for Govinda teams | गोविंदा पथकांना महापालिका देणार विमा संरक्षण

गोविंदा पथकांना महापालिका देणार विमा संरक्षण

Next

विरार : दरवर्षी होणाऱ्या दहिहंडी उत्सवात अनेक जणांचे अपघात होतात. त्यात अनेक जणांना गंभीर दुखापत होते तर काही जणांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे अशा गोविंद पथकांच्या संरक्षणची जबाबदारी वसई विरार महानगरपालिकेने घेतली आहे. अपघातग्रस्त गोविंदाना उपचारास्तव विमा संरक्षण देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आणि यासाठी गोविंद पथकांची नावे मागविण्याची प्रकिया सुरु आहे.
पुढच्या महिन्यात ३ सप्टेंबर ला येणाºया दहिहंडी सणासाठी सर्व गोविंद पथक तयारीला लागले आहेत. वसई विरार महापालिका हद्दीत अंदाजे १०० हून अधिक पुरु ष व महिला दहीहंडी पथकांचा समावेश आहे तर प्रत्येक पथकामध्ये ६० ते ७० गोविंदांचा समावेश आहे. यावेळी चार हजार गोविंदांचा समावेश असल्याचा अंदाज पालिकेने गृहीत धरला आहे.
गोविंदा संरक्षण देण्याकामी मे. ओरिएंटल इन्सुरन्स कंपनीने विमा संरक्षण देण्याबाबत माहिती व विमा काढल्यास त्याचे दरपत्रक पालिकेला दिले होते. या कंपनीने नमूद केल्याप्रमाणे गोविंदाचा अपघाती विमा काढण्यासाठी प्रती व्यक्ती ७५ रुपये एवढा खर्च होणार आहे. गेल्या वर्षी ३ हजार ६५० गोविंदांचा विमा काढण्याकता १ लाख ३० हजार ८५४ रुपये एवढा खर्च झाला होता. यावर्षी हा खर्च ३ लाखापर्यंत येण्याचा अंदाज असून पालिकेच्या स्थायी समितीने याला मंजुरी दिली आहे.

Web Title: Insurance policy for Govinda teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.