औद्योगिक पट्टय़ाला हवे अग्निशमन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 06:36 AM2017-11-13T06:36:32+5:302017-11-13T06:37:01+5:30

अपातकालिन परिस्थितीत भिवंडी, वसई-विरार तसेच पालघर येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागते. मात्र अंतरमुळे ही मदत सगळे काही संपल्या नंतरच पोहचते. त्यामुळे प्रशासनाने या भागामध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज आहे.

Industrial belt needs fire fighting center | औद्योगिक पट्टय़ाला हवे अग्निशमन केंद्र

औद्योगिक पट्टय़ाला हवे अग्निशमन केंद्र

Next
ठळक मुद्देआगीच्या घटना वाढल्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा व वाड्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष

राहुल वाडेकर। 
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा तालुक्यांसाठी अग्निशमन दल नसल्याने येथील औद्योगिक पट्टय़ामध्ये तसेच भाताच्या भार्‍यांना लागणार्‍या आगी विझवणे अशक्य होत असून गत काही वर्षांमध्ये यात अनेकांचा जीव गेला असून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. अपातकालिन परिस्थितीत भिवंडी, वसई-विरार तसेच पालघर येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागते. मात्र अंतरमुळे ही मदत सगळे काही संपल्या नंतरच पोहचते. त्यामुळे प्रशासनाने या भागामध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज आहे.
वाडा तालुक्यातील औद्योगिक पट्टयात होणार्‍या अगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी तसेच वाडा येथे अग्निशमन दलाची सध्यस्थित गरज भासत असल्याने या ग्रामीण भागासाठी येथीन सक्षम नगरपंचायतीवर अग्निशमन दल स्थापन करण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी मागणी उद्योजक व ग्रामस्थ करीत आहेत.  
वाडा व विक्रमगड तालुका विकास क्षेत्र (डी. झोन) जाहिर झाल्यापासून या परिसरात राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले पाय रोवले आहेत.  येथे मोठया प्रमाणावर लहान-मोठे रासायनिक कारखाने आहेत.  त्यात एखादी आग लागल्यास वा स्फोट झाल्यास दुरवर असलेल्या भिवंडी-पालघर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागते.   तर विक्रमगड, मोखाडा, खोडाळा या भागात कंपन्या जरी कमी असल्या तरी लहान मोठे उदयोग तसेच गवताच्या वखारी मोठया प्रमाणावर आहेत. 
विक्रमगड तालुक्यात गवत पाओली वखार व्यवसाय मोठय़ा प्रमाणात होत असल्याने या वखारींना आग लागून मोठे नुकसान होण्याची भिती असते.  पाली येथील टायर कंपनीस गेल्यावर्षी लागलेल्या आगीत कंपनीचे मटेरियल जळून खाक झाले होते.  तर झडपोली येथील सांबरे यांचे गवताच्या वखारीस गेल्यावर्षी लागलेल्या आगीत गवताची गंज जळून खाक झाले होते.  यामध्ये कोटयांवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
 

Web Title: Industrial belt needs fire fighting center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.