पतीने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा काढला काटा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:20 AM2019-07-19T00:20:15+5:302019-07-19T00:20:21+5:30

त्या दोघांनी प्रेमिकेवर जीवघेणा हल्ला केला त्यात ती बेशुद्ध झाली.

Husband removed a woman with the help of a husband? | पतीने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा काढला काटा?

पतीने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा काढला काटा?

Next

पारोळ : प्रेमिका आपल्या संसारात अडसर ठरू लागल्याने पतीने तिचा काटा पत्नीच्या मदतीने काढण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला तो प्रेमिकेला सोबत घेऊन पत्नीसह तुंगारेश्वराच्या अरण्यात गेला व त्या दोघांनी प्रेमिकेवर जीवघेणा हल्ला केला त्यात ती बेशुद्ध झाली. परंतु ती मयत झाली असे वाटून पती,पत्नी तिला जंगलात सोडून पळून गेले. त्याच मार्गाने येत असलेल्या सदानंद महाराजांच्या भक्तांनी तिला आपल्या रिक्षात बसवून तिला जंगलातून खाली आणून तिचे प्राण वाचविले.
नायगाव पूर्वेला असलेल्या परेरा नगरमध्ये राहत असलेल्या मनोहर शुक्ला याचे मागील काही वर्षांपासून महामार्गावरील नायगाव फाटा, बापाणे येथील महेंद्र चाळीत राहणाऱ्या नयना रामचंद्र महंत, २३ या महिले बरोबर प्रेमसंबंध होते. या संबंधात सर्व काही आलबेल असताना मागील काही महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध पत्नीसमोर उघड झाल्याने नयना त्यांच्या संसारात अडचण ठरू लागली होती. यामुंळे पत्नी पौर्णिमा व मनोहरमध्ये वारंवार खटके उडत होते. त्यामुळे नयनाचा काटा काढण्याचे पती व पत्नीने ठरवून बुधवारी तिला देवदर्शन करायचे आहे, असे सांगून मनोहर व त्याच्या पत्नीने स्कुटीवर बसवून तुंगारेश्वरच्या पारोळ बाजूकडील सदानंद महाराज आश्रमाकडे जाणाºया रस्त्यावरून जंगलात नेले. घनदाट जंगलातील रस्त्याच्याकडेला असलेल्या एका निर्जनस्थळी स्कुटी थांबवून आपल्याला काही बोलायचे आहे, असे सांगून उतरलेल्या नयनाच्या अंगावर स्कुटी घालून जोरदार धडक दिली. या आकस्मिक घटनेत नयना खाली पडली. तिला त्याच स्थितीत झाडीत ओढून नेवून तिच्या डोक्यावर व अंगावर दगड घातला . यामुळे नयना गंभीर जखमी होऊन निपचित पडली. यामुळे ती मेली असल्याचे समजून मनोहर व प्रमिलाने तिची पर्स व मोबाईल घेऊन तेथून पोबारा केला. या घटनेनंतर रस्त्यावरून संध्याकाळच्या वेळेस श्री सदानंद महाराज आश्रमात गेलेले भाविक आपल्या घराकडे परतत असतांना कोणाच्यातरी कण्हण्याचा आवाज येत असल्याने ते त्या दिशेने गेले असता नयना दिसली. त्यांनी लागलीच आपल्या रिक्षामधून तिला खाली आणून पुढे रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले आहे. विरार ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Husband removed a woman with the help of a husband?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.