आदिवासींना घरगुती गॅसचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 04:38 AM2018-04-22T04:38:57+5:302018-04-22T04:38:57+5:30

गावातील शंभर आदिवासी लाभार्थ्यांना शेगडीसह एलपीजी गॅस वाटप करण्यात आले.

House gas distribution to tribals | आदिवासींना घरगुती गॅसचे वाटप

आदिवासींना घरगुती गॅसचे वाटप

googlenewsNext

बोर्डी : संयुक्त वन व्यवस्थापन समिती जळवाई आणि प्रधानमंत्री उज्वला प्लस योजनेअंतर्गत घरगुती गॅसचा सुरक्षित वापरा बाबत जनजागृती कार्यक्रम २० एप्रिल रोजी अस्वाली ग्रामपंचायत सभागृहात पार पडला. यावेळी गावातील शंभर आदिवासी लाभार्थ्यांना शेगडीसह एलपीजी गॅस वाटप करण्यात आले.
भारत गॅस एजन्सीच्या बोर्डी सहकारी ग्राहक भांडाराकडून श्राव्य माध्यम आणि प्रात्यक्षिकेद्वारे रेग्युलेटर, शेगडी, लायटरचा वापर आदी. सुरक्षात्मक हाताळणी बाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्र माचे अध्यक्ष पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे म्हणाले की, जंगलानजीकच्या वस्तीने गॅस वापरने ही काळाची गरज आहे. त्यामुळे उपजीविकेचे साधन ठरणाऱ्या वनऔषधी आणि रानभाज्यांसह जंगल वाचवण्यास मदत होईल. जिल्हा परिषदेच्या योजनेतून गॅसचा लाभ देण्याकरीता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेचे यशापयश नागरिकांच्या संवेदनशील वर्तनावर अवलंबून असून वंशपरंपरागत लाभलेले जंगल वाचवण्याचे आवाहन डहाणू उपवन संरक्षक एन. लडकत यांनी भाषणातून केले. या पश्चिम घाटातील जंगल कटाईवर मात करण्यासह आणि वन्यजीव वाचिवण्यात ही योजना प्रभावी ठरेल असे वाईल्डलाईफ कझरवेशन अँड एॅनिमल वेल्फेअर असोसियशनचे उपाध्यक्ष सूर्यहास चौधरी यांनी याबाबत विश्वास व्यक्त केला. आदिवासी महिलांकरिता हा मोठा हातभार असल्याचे अस्वाली सरपंच सुनीता वरठा म्हणाल्या. या वेळी बोर्डीचे सरपंच प्रेरणा राठोड, जांबूगावचे सरपंच गोकुळ धोडी, सहायक वन संरक्षक डी. जे. पवार, झाई ग्रा. सदस्य विनीत राऊत, ग्राहक भांडाराचे दिनकर चुरी, भालचंद्र चुरी, जगदीश राऊत, अस्वाली ग्रामसेवक अशोक तेलोरे उपस्थित होते.

शंभर गॅस पैकी ६० आमदार निधीतून तर, ४० वन विभागाकडून देण्यात आले असून त्या मध्ये शेगडी, सुरक्षा नळी, लायटर आणि रेग्युलेटरचा समावेश आहे. येत्या दहा दिवसात अन्य १०० जोडण्या याच योजनेतून देणार आहेत.’
- व्रजेश शहा (चेअरमन,
बोर्डी सहकारी ग्राहक भांडार)

Web Title: House gas distribution to tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.