वसई महापालिकेच्या पेटीट हॉस्पिटलद्वारे ‘अशी ही रुग्णसेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:40 PM2019-04-20T23:40:05+5:302019-04-20T23:40:20+5:30

ब्रेस्ट कॅन्सरवर केली शस्त्रक्रिया; सफाळे येथील महिलेला जीवदान 

This hospital service was done by Vasudeo Patil's Petit Hospital. | वसई महापालिकेच्या पेटीट हॉस्पिटलद्वारे ‘अशी ही रुग्णसेवा’

वसई महापालिकेच्या पेटीट हॉस्पिटलद्वारे ‘अशी ही रुग्णसेवा’

googlenewsNext

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयाने एका महिलेच्या ब्रेस्ट कॅन्सरवर मोफत शस्त्रक्रिया केल्याची माहिती वसईतील आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी लोकमत ला दिली.

या महिलेच्या शरीरातील २.९ किलो वजनाची कॅन्सरची गाठ काढून तिला जीवनदान दिले. दरम्यान महापालिकेने नुकतीच पालिकेच्या
रुग्णालयात विनामूल्य उपचार व शस्त्रक्रिया करण्याची घोषणा केली होती. या शस्त्रक्रियेमुळे ती प्रत्यक्षात उतरवली गेली आहे. ही रूग्ण महापालिका हद्दीबाहेरील असून देखील वसई विरार महापालिकेच्या आरोग्यसेवेने समाजसेवेचा एक जणू आदर्शच या रुपाने साकाराला आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार,मागील दीड वर्षापासून सफाळ्याच्या एका ३५ वर्षीय महिलेला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तिची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिला मुंबईतील नायर, टाटा सारख्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे शक्य नव्हते. यामुळे ती कमालीची त्रस्त होती. दरम्यान या महिलेची कहाणी लोकलने प्रवास करणाऱ्या वसईच्या डी. एम .पेटिट हॉस्पिटलच्या परिचारिका अमिता संखे रा.( वाडा )यांनी ऐकली असता या तिला त्यांनी आश्वस्त केल आणि ही बाब त्यांनी तात्काळ आपल्या हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. पालिकेच्या डी. एम. पेटीट रुग्णालयाने तिला मदतीचा हात दिला.

अखेर रुग्णालयाच्या डॉ. कांचन गाळवणकर व डॉ. गुंजिकर यांनी आपल्या सहकारी डॉक्टर्स व पारीचारीकांसह त्या महिलेवर दि.५ एप्रिल रोजी यशस्वी शस्त्रक्रि या केली. या शस्त्रक्रि येत या दोन मुख्य डॉक्टरांच्या सोबत डॉ. स्नेहल,डॉ वैभव डॉ,अस्लम शेख,डॉ धनुश्री,सिस्टर्स कॅरेल, लोपीस, आणि अमिता या टीमने हे उपचार केले.

विशेष म्हणजे महापालिका
रुग्णालयाने या महिलेवरील सर्व तपासण्या व शस्त्रक्रि या विनामूल्य केल्याने रु ग्णाच्या कुटुंबियांनी या पालिकेच्या डी एम पेटीट रु ग्णालयातील सर्व डॉक्टर्स व संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाºयांचे आभार मानले आहेत.
हेच उपचार तिने खाजगी रुग्णालयात घेतले असते तर त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले असते. तिच्याकडे एवढे आर्थिक बळ नव्हते. तसेच तिला मेडिक्लेमसारखे संरक्षणही नव्हते त्यामुळे तिच्यासाठी हे उपचार म्हणजे एक चमत्कारच ठरले आहे.

Web Title: This hospital service was done by Vasudeo Patil's Petit Hospital.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.