वसई महापालिकेकडूनच होर्डिंगबंदी धाब्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:54 AM2019-02-04T03:54:16+5:302019-02-04T03:55:04+5:30

वसई- विरार पालिकेच्या डोळ्यादेखत शहरातील ९ प्रभाग समित्यांच्या विविध भागात बेकायदा होर्डिंग व फलकांचा बेसुमार सुळसुळाट झाला

 Hospices bill from Vasai Municipal Corporation? | वसई महापालिकेकडूनच होर्डिंगबंदी धाब्यावर?

वसई महापालिकेकडूनच होर्डिंगबंदी धाब्यावर?

Next

वसई : वसई- विरार पालिकेच्या डोळ्यादेखत शहरातील ९ प्रभाग समित्यांच्या विविध भागात बेकायदा होर्डिंग व फलकांचा बेसुमार सुळसुळाट झाला असून असून देखील प्रभाग स्तरावरून कुठलीही ठोस कारवाई होतांना आढळत नसल्याने पालिका प्रशासनाबाबत नागरिकांची नाराजी वाढत आहे.
मुळातच शहरात पालिका प्रशासनाने स्वत:च्या आरोग्य विभाग अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१९’ या उपक्रमाची जाहिरात करण्यासाठी अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग उभारले असून तिने स्वत:च तयार केलेल्या जाहिरात बंदीचा नियम धाब्यावर बसून शहरात मिळेल त्याठिकाणी आपल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण -२०१९’ चे मोठे होर्डिंग लावून शहर बकाल केले आहे.
दरम्यान सन २०१७-१८ मध्ये वसई -विरार पालिकेकडून घेण्यात आलेला नव्या जुन्या फलक बंदीचा निर्णय खुद्द महापालिका प्रशासनाकडून याठिकाणी धाब्यावर बसवण्यात आला असल्याची ओरड जनता करीत आहे,
महापालिका सहभागी असलेल्या या स्वच्छ सर्वेक्षणाच्या जाहिराती करणारे फलक वसई विरार शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले असून यातील काही फलक झाडांवर, विजेचे खांब आणि केबलच्या लाल डीपीवर लटकवले असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एकीकडे पालिकेने स्वत: उभारलेली होर्डिंग वगळता इतर कोणत्याही ठिकाणी होर्डिंग -फलक-बॅनर लावण्यास मनाई केली असली तरी हा नियम केवळ कागदावरच बरा आहे, मात्र तरीही दुसरीकडे बंदी मोडून कोणी फलक लावले असतील तर महापालिका संबंधितांवर दंड अथवा गुन्हे दाखल करण्याची कायद्यात तरतूद असताना देखील ती का करीत नाही हे मात्र कोड आहे. परंतु अक्षरश: हे होर्डिंग विजेचे खांब व लाल डीपी वर लावले असून असे शहरात शेकडो होर्डिंग झाडावर, गल्लीत, कुठे ही लटकवून ठेवले आहेत

बंदी गुंडाळली बासनात?

याच बंदीचा निर्णय महापालिकेने स्वत: च बासनात गुंडाळून ठेवला असल्याचे चित्र सध्या शहरातील अनेक छायाचित्रावरून दिसून आले आहे.

Web Title:  Hospices bill from Vasai Municipal Corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.